एक्स्प्लोर

Mallikarjun Kharge Congress President : 137 वर्षीय काँग्रेसचे 80 वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे नवे 'सरसेनापती'! भारत जोडो यात्रेतील 'जोश' टिकवण्याचे तगडे आव्हान

Mallikarjun Kharge Congress President : मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरुर यांचा पराभव करत काँग्रेस अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. थरूर यांनी खर्गे यांना शुभेच्छा दिल्या. 

Mallikarjun Kharge Congress President : देशातील सर्वांत जुन्या काँग्रेस पक्षाला तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे शशी थरुर यांचा एकतर्फी पराभव करत काँग्रेसचे 'सरसेनापती' झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 9 हजार  800 जणांनी मतदान केले होते. खर्गे यांना 7 हजार 897 मते पडली. विरोधी शशीर थरुर यांना 1072 हजार मते मिळाली. थरूर यांनी पराभवाचा स्वीकार करत खर्गे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

खर्गे 1969 पासून सक्रिय राजकारणात 

काँग्रेसचे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी भागात एका शेतकरी कुटुंबात झाला. गुलबर्गा येथील नूतन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर येथील शासकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. येथे ते विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीसही होते. गुलबर्ग्याच्या सेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून एलएलबी केल्यानंतर त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. 1969 मध्ये ते MKS मील्स एम्प्लॉईज युनियनचे कायदेशीर सल्लागार बनले. त्यानंतर त्यांनी कामगारांसाठी लढा दिला. ते युनायटेड ट्रेड युनियनचे प्रभावी नेते होते.

1972 मध्ये पहिल्यांदा आमदार, सलग नऊवेळा विजयश्री

1969 मध्येच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची लोकप्रियता पाहून पक्षाने त्यांना गुलबर्गा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केले. 1972 मध्ये ते पहिल्यांदा कर्नाटकातील गुरुमितकल विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. खर्गे गुरुमितकल मतदारसंघातून नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले. या कालखंडात त्यांनी विविध खात्यांचे मंत्रीपदही भूषवले. 2005 मध्ये त्यांना कर्नाटक प्रदेश काँग्रेसची जबाबदारी मिळाली होती. 2008 पर्यंत ते या पदावर होते. 2009 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

खर्गे हे गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू मानले जातात. 2014 मध्ये खर्गे लोकसभेत विरोधी पक्षनेते झाले. 2019 लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने त्यांना 2020 मध्ये राज्यसभेवर पाठवले. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला तेव्हा खर्गे यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली. 

काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्याचे आव्हान

काँग्रेस 137 वर्षांच्या इतिहासात सर्वांत वाईट कालखंडातून जात आहे. पक्षासमोर 2024 च्या निवडणुकीसाठी तगडे आव्हान आहे. काँग्रेसमध्ये नव्याने जाण फुंकण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पदभ्रमंती करत आहेत. या यात्रेने 1 हजार किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता तोच प्रतिसाद पक्षाला सक्रीय करून 2024 पर्यंत कायम ठेवण्याचे तगडे आव्हान खर्गे यांच्यासमोर असेल. आपली निर्णय प्रक्रिया स्वतंत्र आहे हे सुद्धा त्यांना कृतीतून सिद्ध करून दाखवावं लागेल. 

22 वर्षांनी अध्यक्षपदासाठी निवडणूक

काँग्रेस पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी 1939, 1950, 1977, 1997 आणि 2000 मध्ये निवडणुका झाल्या आहेत. यावेळी तब्बल 22 वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.

काँग्रेस मुख्यालयाबाहेर खर्गे यांच्या विजयाचा जल्लोष

दरम्यान, काँग्रेस मुख्यालयाबाहेर खर्गे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. खर्गे समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचा विजय साजरा केला. विजयानंतर सचिन पायलट, गौरव गोगोई, तारिक अन्वर आदी नेत्यांनी खर्गे यांची भेट घेतली. याशिवाय मोठ्या संख्येने कामगार त्यांच्या घरी पोहोचले.

तत्पूर्वी, अध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची घोषणा केली होती. राहुल गांधींना त्यांच्या पक्षातील भूमिकेशी संबंधित प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष माझी भूमिका ठरवतील, खर्गे यांना विचारा. काँग्रेस अध्यक्ष हे सर्वोच्च आहेत. मी त्यांनाच रिपोर्ट करेन. पक्षाचे नवे अध्यक्ष पक्षातील माझी भूमिका ठरवतील.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget