एक्स्प्लोर
Advertisement
'अयोध्या नहीं, कर्जमाफी चाहिए'; दिल्लीत शेतकऱ्यांचा आक्रोश
विविध मागण्यांसाठी देशभरातील 200 शेतकरी संघटनांकडून बुधवारपासून राजधानी दिल्लीत आंदोलन सुरु आहे.
नवी दिल्ली : विविध मागण्यांसाठी देशभरातील 200 शेतकरी संघटनांकडून बुधवारपासून राजधानी दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनासाठी देशभरातील हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. हे शेतकरी आज रामलीला मैदान ते संसद भवन असा लाँग मार्च काढणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या आंदोलनासाठी देशातल्या 200 शेतकरी संघटनांना एकत्र आणले आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या
- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेगळे अधिवेशन बोलवा
- स्वामीनाथन आयोग लागू करावा
- शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी
- शेतमालाला दीडपट हमीभावा द्यावा
राजधानी दिल्लीत शेतकरी मोर्चाचा आज दुसरा दिवस..रामलीला मैदानावरून संसद मार्गाकडे कूच करणार आज शेतकरी. pic.twitter.com/fEtPER4bjf
— prashant kadam (@_prashantkadam) November 30, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement