Vava Suresh : 'हा माझा दुसरा जन्म' स्नेक कॅचर वावा सुरेशला डिस्चार्ज; कोब्रानं केला होता दंश
वावा सुरेश हा 31 जानेवारी रोजी कोट्टायम जवळील कुरिची ग्रामपंचायतीमधील एका घरात सुरेश कोब्रा पकडण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याला कोब्रानं दंश केला.
Vava Suresh : भारतात स्नेक कॅचर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळचा सर्पमित्र वावा सुरेशला (Vava Suresh) कोब्रानं दंश केला होता. त्याच्यावर कोट्टायम (Kottayam) येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. वावा सुरेशला डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर सुरेशचे जनतेने जोरदार स्वागत केले. वावा सुरेशनं व्ही.एन. वसावन यांचे आभार मानले. 'त्यांनी केलेल्या मदतीमुळे माझे प्राण वाचले.', असं सुरेश म्हणाला. त्यांने MCH कर्मचार्यांचे देखील आभार मानले.
सुरेशनं सांगितलं की एक वन विभाग अधिकाऱ्यानं त्याच्या त्याच्याविरुद्ध चुकीची मोहीम सुरू केली होती. सुरेशनं साप पकडण्यासाठी कोणत्याही उपकरणांचा वापर न केल्यामुळे त्यांच्यावर होत असलेल्या टीकेबद्दल देखील सांगितले. एका मुलाखतीमध्ये सुरेश म्हणाला, 'यापुढे मी साप पकडण्यात अधिक काळजी घेईन. मात्र, मी मरेपर्यंत हा व्यवसाय सुरू ठेवणार आहे.' वावा सुरेश हा 31 जानेवारी रोजी कोट्टायम जवळील कुरिची ग्रामपंचायतीमधील एका घरात सुरेश कोब्रा पकडण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याला कोब्रानं दंश केला.
वावा सुरेशला अनेकदा सापांनी दंश केला आहे. 2020 मध्ये त्याला पिट व्हायपर सापानं दंश केला होता. आतापर्यंत 3 हजार 500 अधिक सापांनी चावा घेतलाय. त्यापैकी 350 हून अधिक विषारी आणि धोकादायक स्वरूपाचे होते. केरळ हे विशेषत: सापांच्या 110 प्रजातींचं घर म्हणूनही ओळखलं जातं. सुरेश यांनी जवळपास सर्व प्रजातींचे साप पकडले आहेत.
पाहा व्हिडीओ
Sorry to hear that. The last time this happened I visited him in hospital and was relieved at how well he recovered. May God save him to continue his brave services to the people of Thiruvananthapuram. #VavaSuresh https://t.co/ZLuC305YQr
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 31, 2022
संबंधित बातम्या:
- एवढ्या वेळा पराभव झाल्यानंतरही काँग्रेसचा अहंकार जात नाही, संसदेचा वापर हा देशहितासाठी करावा; पंतप्रधानांचा कॉंग्रेसला टोला
- PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधानांचा संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल, कोरोनापासून महागाईपर्यंत काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
- उत्तराखंडमध्ये 'काँटे की टक्कर', काँग्रेस-भाजप की आप, यंदा आकडे कुणाच्या बाजूने?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha