एक्स्प्लोर

PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधानांचा संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल, कोरोनापासून महागाईपर्यंत काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप, भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

PM Modi Lok Sabha Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला.

PM Modi Lok Sabha Speech: कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळातच देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने केल्याचा गंभीर आरोप लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणादरम्यान केला आहे. दरम्यान देशाच्या अधोगतीपासून, महागाई आणि कोरोना या साऱ्याला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका करत मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी मोदी यांनी जवळपास दोन तास भाषण केलं. या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

  1. भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी भारतात भाजप सरकार आल्यापासून आधी काँग्रेस सरकारच्या तुलनेत किती विकास झाला आहे. याबद्दल सविस्तर सांगतिलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा फेरीवाल्यांना देशात कर्ज मिळत आहे, असं नमूद करत मोदी यांनी भाजपने अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे सावरलं हे सांगितलं.
  2. तसंच शस्त्रास्त्र खरेदीमध्ये मोठमोठी राष्ट्रं भल्याभल्यांना देशांना खरेदी करत होती, मेक इन इंडियामधून हे आम्ही थांबवलं. असं म्हणत मोदी यांनी भाजप सरकारने केलेल्या विकासाचा उल्लेख केला.
  3. त्यानंतर 2014 च्या आधी देशात केवळ 500 स्टार्ट अप्स होते. तर सध्याच्या घडीला ही संख्या 50 हजारांवर पोहोचली आहे. हे सांगताना काँग्रेसच्या सरकारनंतर भारताने कशाप्रकारे विकास केला हे त्यांनी यातून सांगण्याचा प्रयत्न केला.
  4. काँग्रेसवर आणखी टीका करताना, काँग्रेस सरकारच्या काळात महागाई दर दुहेरी अंकांमध्ये पोहोचला होता. तेव्हा महागाई आवाक्याबाहेर आहे, असं काँग्रेस सरकार म्हणत होतं. पण आता भाजप सरकारमध्ये  कोरोनाचं संकट असतानाही महागाई 5.3 टक्के राहिली आहे, असंही मोदी म्हणाले.
  5. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी लोकसभेत बोलताना युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात आम्ही 27 कोटी लोकांना दारिद्रय रेषेतून बाहेर काढलं, तर मोदी सरकारने 23 कोटी लोकांना पुन्हा दारिद्रय रेषेत ढकललं, अशी टीका केली होती. याला उत्तर देताना मोदी म्हणाले, 'काही लोकं बोलून जातात.' असं म्हणत सभागृहात राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर पंतप्रधान मोदींनी टोला दिला.
  6. पुढे बोलताना काँग्रेस सरकारने 40 वर्षांत गरीबी तर हटवली नाही, पण गरिबांनी काँग्रेसला हटवलं, अशी टीका करत मोदी यांनी काँग्रेस सरकारवर आणखी हल्लाबोल केला. 
  7. शेतकऱ्यांबाबत बोलताना मोदी म्हणाले, 'महालांमध्ये राहणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या कशा कळणार? छोट्या शेतकऱ्यांना मजबूत करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
  8. या भाषणात मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान नेहरु यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, 'ज्या काळात जागतिकीकरण नव्हतं, त्या काळात नेहरु म्हणाले की, कोरियातील लढाई आपल्या देशावर परिणाम त्यामुळे आपल्या देशातील वस्तूंच्या किंमती वाढतात
    आणि त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात. असं म्हणत देशाच्या पंतप्रधानांनी महागाईची जबाबदारी झटकली होती.' 

  9. या सर्वानंतर काँग्रेसचे निवडणुकीत इतके नुकसान होऊनही, त्यांचा अहंकार कमी होत नाही, अशी जहरी टीका पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.

  10. तर विरोधक 'मोदीवर टीका केल्याशिवाय जगू शकत नाहीत.' असंही मोदी यावेळी म्हणाले.

हे ही वाचा-

 

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget