एक्स्प्लोर

Kerala: नऊ विद्यापीठांतील कुलगुरुंना हायकोर्टाचा दिलासा, अंतिम आदेश येईपर्यंत कुलगुरु पदावर कायम

Kerala High Court: राज्यपालांकडून देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसवर ते अंतिम आदेश देईपर्यंत ते त्यांच्या पदावर कायम राहतील, असं केरळ हायकोर्टानं म्हटलं आहे.

Kerala: केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Kerala Governor Arif Mohammed Khan)  यांनी राज्यातल्या सर्व नऊ विद्यापीठांच्या कुलगुरुंनी (Vice-Chancellors)राजीनामे द्यावेत असं फर्मान काढलं त्याविरोधात कुलगुरु हायकोर्टात (Kerala High Court)  धाव घेतली. त्यानंतर काल संध्याकाळी 4 पासून या प्रकरणी तातडीची सुनावणी घेण्यात आली.  न्यायमूर्ती देवन यांच्या खंडपीठापुढं ही सुनावणी पार पडली. राज्यपालांकडून देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसवर ते अंतिम आदेश देईपर्यंत ते त्यांच्या पदावर कायम राहतील, असं केरळ हायकोर्टानं म्हटलं आहे.

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार राज्यातील नऊ विद्यापीठांच्या कुलगुरूंचा सोमवारी सकाळपर्यंत राजीनामा  मागितला होता.  मात्र त्यानंतर कुलगुरुंनी हायकोर्टात धाव घेतल्यानंतर राज्यपालांना एक पाऊल मागं जावं लागलं आहे. राज्यपालांनी आता त्या कुलगुरुंना कारणे दाखवा नोटीस दिली. कोर्टाने कुलगुरुंना राज्यपालांची सूचना हा आदेश नाही, ते आदेश देतील तेव्हा पाहू सध्या  तुम्ही कुलगुरु पदावर कायम  आहात, असे म्हटले आहे.  

राज्यपालांना राजीनाम्याचे आदेश देण्याचा अधिकार नाही

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील आरीफ मोहम्मद खान यांना राजीनाम्याचे आदेश देण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान राज्यपाल आरीप मोहम्मद खान यांनी कुलगुरुंना तडकाफडकी राजीनामा देण्याच्या आदेशानंतर केरळमधील वातावरण चांगलेच तापले.    सीपीआयचे नेते सिताराम येचूरी यांनी गंभीर टीका केली. येचुरी म्हणाले,  राज्यपालांना असे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तसेच राज्यघटनेनेही तसे करण्याचा अधिकार दिलेला नाही. त्याने जारी केलेला आदेशाला आम्ही हुकूम  समजतो.  ते म्हणाले की यामागील त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. केरळच्या  शिक्षण व्यवस्थेवर कब्जा करणे आणि सर्व ठिकाणी आरएसएस कार्यकर्त्यांची नियुक्ती करणे.  ज्यामुळे शिक्षणव्यवस्था बिघडेल आणि त्यांचा जातीय ध्रुवीकरणाचा अजेंडा पुढे जाईल.

या विद्यापीठाच्या कुलगुरूंना राजीनामा देण्याचे आदेश दिले

केरळ विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ, कोचिन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कन्नूर विद्यापीठ, एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल विद्यापीठ, श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठ, कालिकट विद्यापीठ,  थुंचथ एजुथाचन मल्याळम  विद्यापीठ, कॅलिकट विद्यापीठ
 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget