एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्नाटकमधील जेडीएस-काँग्रेस सरकार धोक्यात, 12 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत
कर्नाटकमध्ये नव्या राजकीय हालचाली सुरु आहेत. सत्ताधारी जेडीएस आणि काँग्रेसचे मिळून 12 आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी गेले आहेत.
बंगळुरु : कर्नाटकमध्ये नव्या राजकीय हालचाली सुरु आहेत. सत्ताधारी जेडीएस आणि काँग्रेसचे मिळून 12 आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी गेले आहेत. यामध्ये जेडीएसच्या 3 तर काँग्रेसच्या 9 आमदारांचा समावेश आहे. हे 12 आमदार विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवण्यासाठी गेले असल्याची कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
या 12 आमदारांनी राजीनामा दिला तर कर्नाटकमधील सरकार धोक्यात येईल. या संकटातून मार्ग काढण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रभारी वेणुगोपाल आज संध्याकाळी बंगळुरुमध्ये दाखल होणार आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकचे राज्यपाल 17 जुलै रोजी विधानसभेत बहुमत सादर करण्याचे आदेश देऊ शकतात. दरम्यान सोमवारी कर्नाटकमधील विजयनगर मतदारसंघाचे आमदार आनंद सिंह यांनी राजीनामा दिला आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांची संख्या सातत्याने घटत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह एकूण 80 आमदार आहेत. तर जेडीएसकडे 37 आमदार आहेत. दोन्ही मिळून 117 आमदारांच्या संख्याबळावर जेडीएस-काँग्रेस सत्तेत आले होते. तसेच बहुजन समाज पार्टी आणि एका अपक्ष आमदारानेदेखील या सरकारला पाठिंबा दिला होता.
कर्नाटकात काँग्रेसचे आमदार फोडून सत्तास्थापनेचे भाजपचे प्रयत्न | एबीपी माझा
या 12 आमदारांनी राजीनामा दिला तर काँग्रेस आमदारांची संघ्या 80 वरुन 70 होईल, तर जेडीएसच्या आमदारांची संघ्या 34 होईल. दोन्ही मिळून 104 आमदार होतील. तसेच त्यांच्यासोबत बसपाचा एक आणि अपक्ष एक असे दोन आमदार आहेत.
"दया न दाखवता त्यांना मारुन टाका," कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल
या परिस्थितीत भारतीय जनता पक्ष कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भाजपकडे 105 आमदार आहेत. तसेच त्यांच्याकडे दोन अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्याकडील आमदारांची संख्या 107 होईल.
Bengaluru: Five Congress MLAs and three JDS MLAs, including Ramesh Jarkiholi,H Vishwanath, Pratap Gowda Patil arrive to meet Karnataka assembly speaker KR Ramesh Kumar. pic.twitter.com/ky5W6Kx9UO
— ANI (@ANI) July 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement