एक्स्प्लोर
Advertisement
कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस सरकारला धक्का, 11 आमदारांचा राजीनामा
कर्नाटक राज्य पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. सत्ताधारी जेडीएस आणि कांग्रेसच्या 11 आमदारांनी आज (शनिवार) विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
बंगळुरु : कर्नाटक राज्य पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे. सत्ताधारी जेडीएस आणि कांग्रेसच्या 11 आमदारांनी आज (शनिवार) विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा दिला आहे. यामध्ये काँग्रेसचे 8 आणि जेडीएसच्या 3 आमदारांचा समावेश आहे.
या 11 आमदारांचा राजीनामा मंजूर झाला तर कर्नाटक राज्यातील बहुमत हे भाजपकडे झुकण्याची दाट शक्यता आहे. तर राज्यपाल येत्या 17 जुलैला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसच्या एकूण 8 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसच्या गोटात शांतता पसरली आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेसचे प्रभारी वेणुगोपाल आज संध्याकाळी बंगळुरुमध्ये दाखल होणार आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकचे राज्यपाल 17 जुलै रोजी विधानसभेत बहुमत सादर करण्याचे आदेश देऊ शकतात. दरम्यान सोमवारी कर्नाटकमधील विजयनगर मतदारसंघाचे आमदार आनंद सिंह यांनी राजीनामा दिला आहे.
कर्नाटकात काँग्रेसचे आमदार फोडून सत्तास्थापनेचे भाजपचे प्रयत्न | एबीपी माझा
कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांची संख्या सातत्याने घटत आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह एकूण 80 आमदार आहेत. तर जेडीएसकडे 37 आमदार आहेत. दोन्ही मिळून 117 आमदारांच्या संख्याबळावर जेडीएस-काँग्रेस सत्तेत आले होते. तसेच बहुजन समाज पार्टी आणि एका अपक्ष आमदारानेदेखील या सरकारला पाठिंबा दिला होता.
"दया न दाखवता त्यांना मारुन टाका," कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल
या 11 आमदारांनी राजीनामा दिला तर काँग्रेस आमदारांची संघ्या 80 वरुन 71 होईल, तर जेडीएसच्या आमदारांची संघ्या 34 होईल. दोन्ही मिळून 105 आमदार होतील. तसेच त्यांच्यासोबत बसपाचा एक आणि अपक्ष एक असे दोन आमदार आहेत.
या परिस्थितीत भारतीय जनता पक्ष कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भाजपकडे 105 आमदार आहेत. तसेच त्यांच्याकडे दोन अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्याकडील आमदारांची संख्या 107 होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement