(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kargil Vijay Din : पंजाब सरकारचा मोठा निर्णय, शहीद जवानांच्या कुटुंबाला मिळणार एक कोटी रूपये
kargil vijay diwas 2022 : शहीद जवानांच्या कुटुंबाला या पुढे एक कोटी रूपयांची मदत मिळणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
Kargil Vijay Din : कारगील विजय दिवसाच्या (Kargil Vijay Diwas 2022) निमित्ताने पंजाब सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. शहीद जवानांच्या (Martyred Soldiers ) कुटुंबाला या पुढे एक कोटी रूपयांची मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री भगवंत (Bhagwant Mann ) मान यांनी याबाबतची घोषणा केली आहे. शत्रूसोबत सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून एक लाख रूपये देण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंजाब सरकार देत असलेली एक कोटी रूपयांची मदत ही सैनिकांच्या बलिदानाच्या बरोबरीची नसले तरी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून आम्ही त्यांना 1 कोटी रुपये देऊ, असे मुख्यमंत्री भगवंत मान मदतीची घोषणा करताना म्हणाले.
कारगिल विजय दिवसानिमित्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज चंदीगड येथील युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, देशासाठी आपल्या हुतात्म्यांचे बलिदान आपल्या भावी पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. कारगिल विजय दिवस हा भारतीय सशस्त्र दलाच्या असामान्य शौर्याचे प्रतीक आहे. या युद्धात भारतीय सैनिकांनी त्याग, शौर्य आणि पराक्रमाची अभूतपूर्व गाथा लिहिली आहे.
"अनेक अडचणींचा सामना करत भारतीय सैन्याने जुलै 1999 मध्ये कारगिल भागात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला पराभूत केले. भारतीय जवानांनी त्यावेळी आपल्या पराक्रमाचे अतुलनीय शौर्य दाखवले, अशा भावाना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कारगिल दिवसाच्या निमित्ताने चंदीगडमधील बोगनविले गार्डन येथील युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला आणि कारगिल ऑपरेशन दरम्यान आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पंजाबच्या शूर सुपुत्रांना अभिवादन केले.
महत्वाच्या बातम्या