एक्स्प्लोर

Marriage : हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही, सप्तपदी महत्त्वाचा विधी : उच्च न्यायालय

Hindu Marriage Act : हायकोर्टाने एका प्रकरणी निकाल देताना म्हटलं आहे की, हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही, तर सात फेरे आवश्यक आहेत.

मुंबई : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं. हिंदू विवाहामध्ये कन्यादान (Kanyadaan), सप्तपदी (Saptapadi) यांचा समावेश असतो. दरम्यान, हिंदू विवाहामध्ये कन्यादान करण्याची गरज नसते, मात्र सप्तपदी (Saptapadi) आवश्यक विधी आहे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी अलाहाबाद हायकोर्टाने केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देताना म्हटलं आहे की, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत (Hindu Marriage Act) सप्तपदीची (Saat Phere) आवश्यकता असते, कन्यादानाची आवश्यकता नसते. अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) ही महत्त्वाची टिपण्णी केली आहे.

हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी दरम्यान हे सांगितलं आहे. लखनौ खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी दरम्यान सांगितलं की, हिंदू विवाहामध्ये फक्त फक्त सप्तपदी एक महत्त्वाचा विधी आहे, कन्यादान नाही. आशुतोष यादव या याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.

हिंदू विवाहात सप्तपदी आवश्यक : हायकोर्ट

लखनौ खंडपीठाने याचिकाकर्ता आशुतोष यादव यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, हा महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या एक पीठाने या प्रकरणावर भाष्य करताना, उच्च न्यायालयाने खटल्यातील साक्षीदारांना बोलावण्याची याचिका फेटाळली आहे. विवाह संपन्न होण्यासाठी कन्यादान विधी आवश्यक नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. 

हायकोर्टाने याचिका फेटाळली

न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या एकल खंडपीठाने सांगितलं की, हिंदू विवाह कायद्यानुसार, फक्त सप्तपदी हा हिंदू विवाहाचा अत्यावश्यक विधी आणि सोहळा मानला जातो. हिंदू विवाह सोहळ्यासाठी कन्यादान विधी आवश्यक असल्याने तरतूद हिंदू विवाह कायदा करत नाही. या टिप्पणीसह, न्यायालयाने साक्षीदारांना पुन्हा बोलावण्याची पुनर्विचार याचिका फेटाळली.

हिंदू विवाह कायदा काय सांगतो?

हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह सोहळ्यासाठी 'कन्यादान' आवश्यक नसल्याची टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली आहे. 'सात फेरे' यासाठी फक्त 'सप्तपदी' हा संस्कृत  शब्द आहे. हिंदू विवाह कायद्या अंतर्गत, सत्पपदी हाच अत्यावश्यक विधी आहे, असे निरीक्षण लखनौ उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने आशुतोष यादव यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना नोंदवलं आहे.

पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली

या प्रकरणात, लखनौच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या आशुतोष यादव नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या पुनरीक्षण याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. या खटल्यात दोन साक्षीदारांना बोलावण्यासाठी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली. याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या विवाह प्रमाणपत्रात हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह सोहळा पार पडला होता, त्यानुसार कन्यादान हा अत्यावश्यक विधी आहे, असा उल्लेख करत चिकाकर्त्याचा दावा नोंदवला होता. यावेळी न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
सोने खरेदी करण्याची स्पर्धा! जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवला, कोणता देश पहिल्या क्रमांकावर?
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
RBI च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल! जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली होणार मजबूत, जाणून घ्या सविस्तर माहिती
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत
LPG PNG टेन्शन संपलं? इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा खुलासा, गॅस पुरवठा सुरळीत
West Bengal : बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका
बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
Embed widget