Kangana Ranaut : नरेंद्र मोदी हे सामान्य व्यक्ती नव्हेत तर 'अवतार', त्यांच्यामुळेच देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले : कंगना रनौत
Kangana Ranaut On Narendra Modi : काँग्रेसने देशाला फक्त लुटण्याचं काम केलं असून भाजपने काँग्रेसच्या गुंडगिरीपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं असं वक्तव्य भाजपची खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतने केलं.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचलच्या मंडीची खासदार कंगना रनौतने पंतप्रधान मोदींची तोंडभरून स्तुती केली. कंगनाने पंतप्रधान मोदींचं 'अवतार' असा उल्लेख केला. यावेळी कंगनाने काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसच्या कालावधीत देशाला फक्त लुटण्यात आल्याचं कंगना रनौत म्हणाली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असंही ती म्हणाली. कंगना हिमालच प्रदेशातील जोगिंदरनगरमध्ये सभेला संबोधित करत होती.
कंगना म्हणाली की, "पंतप्रधान मोदी हे सामान्य व्यक्ती नाहीत तर ते एक अवतार आहेत. ते 2014 मध्ये पंतप्रधान झाले त्यावेळी तरुणांचा राजकारणाबाबत असलेला दृष्टीकोन बदलला. राजकारण म्हणजे दुर्भाग्य आहे अशीच माझंही 2014 पूर्वी मत होतं."
देश जागतिक नेता बनण्याच्या दिशेने
देशात 2014 नंतर मोदी राज सुरू झाल्यानंतर विकासाची नवी लाट आली आहे. नवनवीन प्रकल्प प्रत्यक्षात येत आहेत आणि देश जागतिक नेता बनण्याच्या दिशेने प्रगती करत आहे असा दावाही कंगना रणौतने केला. काँग्रेसच्या राजवटीत देशाला फक्त लुटण्यात आलेअसा आरोप कंगनाने केला.
कंगना म्हणाली की, "मंडी लोकसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे नेतृत्व करूनही 17 विधानसभा मतदारसंघ विकासाच्या मार्गात मागासले आहेत. आता जनतेने माझ्याकडे लगाम सोपवला आहे. मी नवीन प्रकल्प कृतीत आणून संपूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत राहणार."
भाजपने काँग्रेसच्या गुंडगिरीपासून मुक्त केले
कंगना रनौत म्हणाली की, "देशात सत्तेवर येताच भाजपने काँग्रेसच्या गुंडगिरीपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. वक्फ बोर्डासारख्या काळ्या कायद्यात सुधारणा करून देशात समान नागरिकत्व आणि मालकी हक्क देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या हिताचे विधेयक संसदेत मंजूर झाले की काँग्रेसचे खासदारच नव्हे तर त्यांचे नेतेही रस्त्यावर उतरण्याची धमकी देतात."
विरोधकांची कंगनावर टीका
दरम्यान, कंगना रनौतने मोदींना अवतार म्हटल्यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे.
समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी देव 'अवतार' घेत असतो अशी आपली साधी आणि भोळी भावना असते. पण खा. कंगना रानौत यांनी घोषित केलेल्या 'अवतारा'ने रुपयांची किंमत डॉलरच्या तुलनेत पार रसातळाला नेली, महागाई उच्चांकावर नेली, कधी नव्हे ते इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. असंख्य लाडक्या… pic.twitter.com/zAqWNW5jxM
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 8, 2025
ही बातमी वाचा:























