एक्स्प्लोर
भारताला आता थेट स्विस बँकेतील खातेधारकांची माहिती मिळणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्याच्या दृष्टीने आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ऑटोमॅटीक माहिती देवाणघेवाणीबाबतचा संयुक्त करार करण्यात आल्याची माहिती केंद्रीय महसूल सचिव डॉ. हसमुख अधिया यांनी दिली आहे. या करारानुसार 2018 पासून भारताच्या आयकर विभागाला स्विस बँकेतील सर्व भारतीय खातेधारकांची माहिती मिळवण्याचे अधिकार मिळणार आहेत. काळ्या पैशाविरोधातील पंतप्रधान मोदींचं हे मोठं पाऊल मानलं जात आहे. बनावट नोटा, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्दबातल करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांच्या विरोधात आणखी मोठं पाऊल टाकलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























