एक्स्प्लोर
जेएनयू विद्यार्थी संघटना निवडणुकीत चारही जागांवर डावे
जेएनयू विद्यार्थी संघटना निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या चारही जागा बळकावत डाव्यांनी अभाविपच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली.
![जेएनयू विद्यार्थी संघटना निवडणुकीत चारही जागांवर डावे JNU Election Results : Left Unity wins all four seats, sweeps ABVP latest update जेएनयू विद्यार्थी संघटना निवडणुकीत चारही जागांवर डावे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/16150233/Left-JNU.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत चारही जागांवर डाव्यांनी वर्चस्व मिळवलं आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या चारही जागा बळकावत डाव्यांनी अभाविपच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली.
जेएनयू विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत एन साई बालाजी यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी सारिका चौधरी यांची वर्णी लागली आहे. एजाज अहमद यांना संघटनेचं सचिवपद मिळालं आहे, तर सहसचिवपदी अमुथा जयदीप यांनी विजयाची नोंद केली.
एआयएसए (AISA), एसएफआय (SFI), एआयएसएफ (AISF) आणि डीएसएफ (DSF) या चारही डाव्या संघटांनी मिळून आपले उमेदवार दिले होते. अभाविपचे चारही उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
जवळपास पाच हजार (67.8 टक्के) विद्यार्थ्यांनी मतदान केल्याची माहिती आहे. गेल्या सहा वर्षांतील हे उच्चांकी मतदान आहे.
अध्यक्ष
एन साई बालाजी (डावे)- 2161 मतं
ललित पांडेय (अभाविप)- 982 मतं
उपाध्यक्ष
सारिका चौधरी (डावे)- 2692 मतं
गीताश्री बरुआ (अभाविप)- 1012 मतं
सचिव
एजाज़ अहमद (डावे)- 2423 मतं
गणेश गुजर (अभाविप)- 1123 मतं
सह सचिव
अमुथा जयदीप (डावे)- 2047 मतं
वेंकट चौबे (अभाविप)- 1290 मतं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)