'यंदा माझं शेवटचं मतदान', मुलांकडे आग्रह, मतदान करुन येताच 105 वर्षीय पित्याने प्राण सोडले
Jharkhand News : दुपारी अडीच वाजता वरण साहू हे मतदानाचा हक्क बजावून घरी परतल्यानंतर ते खूप आनंदी होते. परंतु, दुपारी तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला.
Jharkhand : 105 वर्षाच्या वृद्धाने मतदान करण्याची आपली शेवटी इच्छा पूर्ण करून अवघ्या अर्ध्या तासात प्राण सोडले आहेत. वरण साहू असे या वृद्धाचे नाव असून ते झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील बेलाही गावातील रहिवासी होते.
झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात शरिवारी पंचायतीसाठी मतदान होते. त्यामुळे साहू यांनी शनिवारी सकाळी कुटुंबातील सदस्यांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याची आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला त्यांच्या तरुण आणि करण या दोन्ही मुलांनी वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदान करण्यात विरोध दर्शवला. परंतु, साहू यांनी वारंवार मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांच्या इच्छेनंतर दोन्ही मुलांनी होकार देत त्यांची मतदान करण्याची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले.
साहू यांना मतदान करण्यासाठी घरापासून दोन किलोमीटर अंतर असलेल्या उपक्रातिक विद्यालयातील मतदान केंद्रावर नेहले. तरुण आणि करण यांनी त्यासाठी गाडी भाड्याने केली. मुलांनी मतदान केंद्रावर वडिलांचे मतदार ओळखपत्र दाखवले त्यावेळी त्यांचा जन्म 27 जून 1917 रोजी झाल्याचा उल्लेख होता. वडिलांनी दुपारी दोन वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला.
दुपारी अडीच वाजता साहू हे मतदानाचा हक्क बजावून घरी परतल्यानंतर ते खूप आनंदी होते. परंतु, दुपारी तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळीच साहू हे दोन्ही मुलांना सांगत होते की, काही झाले तरी मी माझा मतदानाचा हक्क सोडणार नाही. कारण ही आपली मतदान करण्याची शेवटची वेळ असू शकते. साहू यांनी आपल्या तरूण नावाच्या मुलाला शनिवारी सकाळीच ही गोष्ट सांगितले होती. त्यामुळे आम्ही वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली. वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण झाल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी आहोत असे तरूण यांनी सांगितले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे वरण साहू हे गेल्या काही दिवसांपासून झोपून होते. परंतु, मतदानाच्या दिवशी त्यांचा उत्साहा खूप होता. राजकारणाविषयी त्यांना आवडत होती, असे त्यांचा लहान मुलगा किरण याने सांगितले.