एक्स्प्लोर
गोवा-मुंबई विमान धावपट्टीवरुन घसरलं, सुदैवाने अपघात टळला

पणजी : नाताळच्या सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम सुरु असताना विमानं आणि धावपट्ट्या सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न पडणारी घटना आज गोव्यात घडली. गोव्यातल्या दाभोळी विमानतळावरुन आज मोठी दुर्घटना होता-होता टळली.
भल्या पहाटे जेट एअरवेजचं विमान मुंबईच्या दिशेनं रवाना होणार होतं. मात्र टेक ऑफ करताना विमान धावपट्टीवरुन घसरलं आणि सर्व प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

पाहा फोटो : गोवा-मुंबई विमान धावपट्टीवरुन घसरलं, सुदैवाने अपघात टळला
या विमानातून एकूण 154 जण प्रवास करत होते. त्यापैकी 8 ते 10 जणांना किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर आधी दुपारी साडेबारा पर्यंत धावपट्टी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र, अपघातग्रस्त विमान हटवलं गेल्याने धावपट्टी आता सुरु करण्यात आली आहे. https://twitter.com/ANI_news/status/813561997283315712 विमानातील काही तांत्रिक कारणामुळे विमान धावपट्टीवरुन घसरलं. '9W 2374' असं या जेट एअरवेजच्या या विमानाचं नाव आहे. या विमानात 154 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर होते. मुंबईच्या दिशेने प्रवासासाठी उड्डाण घेत असताना विमान धावपट्टीवरुन घसरलं. https://twitter.com/jetairways/status/813568818744147968 "सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप आहेत. काही प्रवाशांना अगदी किरकोळ जखम झाली आहे. वैद्यकीय मदत घटनास्थळी पोहोचली असून, जेट एअरवेजची संपूर्ण टीम आणि दाभोळी विमानतळ प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे", अशी माहिती जेट एअरवेजकडून देण्यात आली आहे.पाहा फोटो : गोवा-मुंबई विमान धावपट्टीवरुन घसरलं, सुदैवाने अपघात टळला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
