JEE Advanced 2021 Date Announced: जेईई अॅडव्हॉन्स परीक्षा 3 जुलैला, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांची घोषणा
JEE Advanced 2021 Date Announced: जेईई अॅडव्हॉन्स परीक्षा 3 जुलैला होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे. जेईई मेन्सच्या वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता जेईई अॅडव्हान्स परीक्षा कधी होणार याबाबत उत्सुकता होती.
JEE Advanced 2021 Date Announced: जेईई अॅडव्हॉन्स परीक्षा 3 जुलैला होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे. जेईई मेन्सच्या वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता जेईई अॅडव्हान्स परीक्षा कधी होणार याबाबत उत्सुकता होती. 75 टक्केची पद्धत यावर्षी हटवली आहे, विद्यार्थ्यांना दिलासा यामुळे मिळणार आहे.
आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE Advanced 2021 परीक्षेची तारीख आज जाहीर करण्यात आली. देशभरात JEE Advanced 2021 परीक्षा 3 जुलै 2021 रोजी घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून दिली आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेताना 75 टक्के ची पात्रता सुद्धा शिथिल करण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी आयआयटी प्रवेशासाठी बारावी परिक्षेत 75 टक्केची पात्रता शिथिल करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे JEE Advanced 2021 परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला आहे. आयआयटी खरगपूरकडून ही JEE Advanced 2021 परीक्षा देशभर घेतली जाणार आहे
याआधी JEE Mains 2021 परिक्षेच्या तारखा मागील महिन्यात जाहीर करण्यात आल्यानंतर आता JEE Advanced 2021 परिक्षेसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ अभ्यासाला मिळावा याचा पूर्ण विचार करून 3 जुलै 2021 ही तारीख ठरवण्यात आल्याचा पोखरियाल यांनी सांगितलं. सीबीएसईसोबतच राज्य मंडळाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षा एप्रिल मे महिन्यात होणार असल्याने या परीक्षेचे वेळापत्रक लक्षात घेऊन 3 जुलै रोजी JEE Advanced 2021 होणार आहे.
देशातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced 2021 परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना JEE Mains 2021 परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी 4 सत्रामध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यास सवलत दिली गेली आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे 2021 या चार सत्रामध्ये जेईई मेन्स परीक्षा घेतल्या जाणार आहे. 16 डिसेंबर 2020 ते 16 जानेवारी 2021 दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज या परीक्षेसाठी करता येणार आहे. जेईई मेन्स 2021 परीक्षा पहिल्यांदाच इंग्रजीसोबत मराठीसह 13 मातृभाषेत ही परीक्षा देता येईल