(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi Meets Japan PM : पंतप्रधान मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांनी मारला पाणीपुरीवर ताव, लस्सीचाही घेतला आस्वाद; पाहा व्हिडीओ
PM Modi Meets Japan PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पाणीपुरीवर ताव मारत लस्सीचाही आस्वाद घेतला.
Japan PM Fumio Kishida India Tour : जपानचे (Japan) पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. किशिदा यांनी यावेळी भारतीय अन्न पदार्थांचा आस्वाद घेतला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना पाणीपुरी खाऊ घातली आणि स्वत:ही पाणीपुरीवर ताव मारला. यावेळी त्यांनी लस्सीचाही आस्वाद घेतला. (PM Modi Meets Japan PM)
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा भारत दौऱ्यावर
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी दौऱ्यावेळी भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चांगला संबंध पाहायला मिळाले.
पंतप्रधान मोदीसह जपानच्या पंतप्रधानांनी मारला पाणीपुरीवर ताव
भारत दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कला भेट दिली. यावेळी त्यांनी पाणीपुरी चाखली. दोन्ही नेत्यांनी पार्कच्या बाकावर बसून कुल्हडमध्ये म्हणजेच मातीच्या कपमध्ये लस्सीचा आस्वाद घेतला.
My friend PM @kishida230 enjoyed Indian snacks including Golgappas. pic.twitter.com/rXtQQdD7Ki
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2023
पाहा व्हिडीओ :
A special visit to the Buddha Jayanti Park with my friend, PM @kishida230. pic.twitter.com/wD0WX6I1vz
— Narendra Modi (@narendramodi) March 21, 2023
बाल बोधी वृक्षाला दिली भेट
दोन्ही नेत्यांनी बुद्ध जयंती पार्कमधील बाल बोधी वृक्षाला भेट दिली. यानंतर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि पंतप्रधान मोदी यांनी येथे पाणीपुरी, लस्सी आणि कैरी पन्हाचा आस्वाद घेतला. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांचे जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी कोविड-19 महामारीनंतर शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगासाठी भारत-जपान धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करण्यासाठी व्यापक चर्चा केली.
पंतप्रधान मोदींनी जपानच्या पंतप्रधानांना दिली खास भेट
पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा परदेशी मान्यवरांना भारतातील विविध राज्ये आणि प्रदेशांच्या सांस्कृतिक आणि कलात्मक समृद्धी दर्शवणाऱ्या भेटवस्तू दिल्या आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना 'कदमवुड जाली बॉक्स' म्हणजेच कदंब लाकडापासून बनवलेला बॉक्समध्ये चंदनाची बुद्ध मूर्ती भेट दिली. ही मूर्ती कर्नाटकातील चंदनाच्या लाकडापासून बनवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :