एक्स्प्लोर

Jamtara Train Accident : जामतारा येथे रेल्वेचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू , अनेकजण चिरडल्याची भिती

Jamtara Train Accident : झारखंडमधील जामतारा येथे रेल्वेचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Jamtara Train Accident : झारखंडमधील जामतारा येथे रेल्वेचा भीषण अपघात (Jamtara Train Accident) झालाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाची एक टीम दाखल झाली आहे. बचावकार्य सुरु करण्यात आलय. ही घटना करमाटांड जवळ कालाझरिया येथे घडली आहे. एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्यानंतर प्रवाशांना याबाबतची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. लोक रेल्वेमधून बाहेर उड्या टाकू लागले. याचवेळी समोरुन येणाऱ्या झाझा-आसनसोल रेल्वेने ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशांना चिरडले. 

आग लागल्यामुळे रेल्वेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न 

याच लाईनवरुन बंगळुरू-यशवंतपूर एक्सप्रेस जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, लाईनच्या बाजूला टाकलेल्या गिट्टीची धूळ उडत होती. मात्र धूळ पाहून गाडीला आग लागल्याचे आणि धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे प्रवाशीही ट्रेनमधून लगेच उतरले. त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्गावर जाणाऱ्या ट्रेनची धडक (Jamtara Train Accident) बसून अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय. 

वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या, बचावकार्य सुरु 

दुसरीकडे रेल्वेकडून हे सांगण्यात येत आहे की, चेन ओढल्यामुळे रेल्वे थांबवण्यात आले होती. त्यानंतर काही लोक रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी समोरुन येणाऱ्या रेल्वेने प्रवाशांना धडक (Jamtara Train Accident) दिली. सध्या दोन लोक गंभीर जखमी असल्याचे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. जामताड उपायुक्तांनीही रेल्वे अपघातात काही लोकांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, “जामतारा येथील कालाझारिया रेल्वे स्थानकाजवळ एका ट्रेनने प्रवाशांना चिरडले. यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आहे.  मृतांचा नेमका आकडा नंतर कळेल. वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे."

इतर महत्वाच्या बातम्या 

BJP : लोकसभेसाठी भाजपची मोठी रणनीती, जिंकलेल्या 23 जागांची जबाबदारी निरीक्षकांवर, खासदारांचं तिकीट त्यांच्या रिपोर्टवर ठरणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025Suresh Dhas PC : संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत  होईल- सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Embed widget