एक्स्प्लोर

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणारा इम्तियाज मागरे आर्मीच्या तावडीतून सुटला, पाण्याच्या खळाळत्या प्रवाहात उडी टाकली अन्

Pahalgam Attack: इम्तियाजने सेनेच्या तावडीतून पळ काढत, सुटकेसाठी थेट पाण्यात उडी घेतली. मात्र तो पळून जाण्यात अपयशी ठरला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 26 पर्यटकांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या संशयित आरोपीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तंगमार्ग येथील अदबल नाल्यात 23 वर्षीय इम्तियाज अहमद मागरेचं शव सापडलं आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय सेनेने मागरेला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार इम्तियाज मागरे हा दहशतवाद्यांचा ऑन ग्राऊंड वर्कर होता. सेनेच्या चौकशीत मागरेने दहशतवाद्यांच्या एका ठिकाण्याची माहिती दिली होती. तसंच सेना त्याला घेऊन दुसऱ्या ठिकाणाकडे निघाली होती. यावेळी इम्तियाजने सेनेच्या तावडीतून पळ काढत, सुटकेसाठी थेट पाण्यात उडी घेतली. मात्र तो पळून जाण्यात अपयशी ठरला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. सेनेने पळून जाणाऱ्या मागरेचं ड्रोन फुटेज समोर आलं आहे. 

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती सुरक्षा दलापासून वाचवण्यासाठी पळताना दिसतो आहे. त्यावेळी तो त्या वाहत्या पाण्यात उडी मारतो आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातो. या व्यक्तीवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि मदत करण्याचा आरोप होता. त्यासाठीच त्याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. मात्र तो गुंगारा देत पळाला. त्यानंतर पोलिसांनी सकाळी कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन सुरू केलं. तो ड्रोन व्हिडिओग्राफीद्वारे कडक देखरेखीखाली असताना वाहत्या पाण्याजवळ लपण्यासाठी गेला. यानंतर त्याने पाण्याच्या प्रवाहात उडी घेतली. त्याने पाणी कमी असेल असं समजून नदीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असाना. त्यावेळी त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काल (रविवारी) सकाळच्या सुमारास एका त्याचा मृतदेह आढळला. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाचा शोध घेत असताना तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता आणि त्याचवेळी त्याने पाण्याच्या प्रवाहात उडी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच नावं  इम्तियाज अहमद मगरे असं आहे, तो 23 वर्षांचा होता. तरुणाला सुरक्षा दलाकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. इम्तियाज कुलगाम जिल्ह्यातील दमहाल हांजीपोरा भागातील तंगमार्ग येथील राहणारा होता. तो मजूरी काम करायचा. शनिवारी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याने दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांबाबत माहिती दिली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने पोलिसांना सांगितलं, की त्याने कुलगाममध्ये तंगमार्ग येथील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना जेवणं आणि निवारा दिला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar : बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास
बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास
US Iran War : इराणसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला, 40 मिनिटे चर्चा, मेगा प्लॅन सांगितला
इराणसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला, 40 मिनिटे चर्चा, मेगा प्लॅन सांगितला
Salary Increment : दोन वर्षे काम करून फक्त 9 रुपयांची पगारवाढ; नोकरी सोडली तर 1.5 लाख दंड, सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा
दोन वर्षे काम करून फक्त 9 रुपयांची पगारवाढ; नोकरी सोडली तर 1.5 लाख दंड, सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget