Pulwama Encounter : पुलवामामध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Jammu Kashmir Encounter : भारतीय लष्करांनी जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे.
Jammu Kashmir Pulwama Encounter : जम्मू कश्मीरमधील पुलवामामध्ये भारतीय सुरक्षादलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे. बुधवारी सकाळी राजपुरा परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यापैकी एक दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा आहे. तर दुसऱ्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर यासीर पर्रेय याचा खात्मा करण्यात आलाय आहे. यासीर आयईडी एक्सपर्ट होता. याच्यासोबत आणखी एका विदेशी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. त्याचं नाव फुरकान असं आहे. लष्करांनी मारलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात होता, अशी माहिती एएनआयला काश्मीरच्या आयजीने दिली आहे.
Pulwama encounter | Two terrorists killed, their identity is being ascertained; search operation underway: Kashmir Zone Police
— ANI (@ANI) December 1, 2021
मंगळवारी रात्री पुलवामामधील राजपुरा येथील कस्बायार गावात सुरक्षा दलाने शोधमोहिम सुरु केली होती. या शोध मोहिमेदरम्यान एका घरात लपलेल्या दोन दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. त्यानंतर प्रत्युत्तरदाखल भारतीय सैन्याकडूनही गोळीबार करण्यात आला. दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय सैन्यानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या परिसरात अद्याप शोधमोहिम सुरु आहे. येथे आणखी एक दहशतवादी लपल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहिम उघडली आहे. काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर हल्ल्याचे प्रमाण वाढल्यानंतर सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात चकमकींची संख्याही वाढली आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
Jammu Kashmir Video | दहशतवाद्याकडून गर्दीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार; 2 पोलीस शहीद
Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; 24 तासांच्या आत 5 दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; अल्पवयीन मुलाचाही समावेश