एक्स्प्लोर
अतिरेक्यांच्या खात्म्यानंतर स्थानिकांचा जवानांशी संघर्ष, सहा मृत्यूमुखी
राष्ट्रीय रायफल्सचा भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येमध्ये जहूरचा समावेश होता. जहूर ठोकर हा सैन्यातच होता. मागील काही काळापासून त्याचा शोध सुरु होता.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये अतिरेक्यांसोबतच्या चकमकीदरम्यान स्थानिक नागरिकांसोबत संघर्ष झाला. या दरम्यान झालेल्या गोळीबारात तीन अतिरेकी आणइ सहा नागरिकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहीमेत जवानांना मोठं यश मिळालं. हिजबुल मुजाहिद्दीनचे कमांडर जहूर ठोकरला कंठस्नान घालण्यात आलं. मात्र या चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. राष्ट्रीय रायफल्सचा भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येमध्ये जहूरचा समावेश होता. जहूर ठोकर हा सैन्यातच होता. मागील काही काळापासून त्याचा शोध सुरु होता. जुलै 2017 मध्ये तो सर्व्हिस रायफलसह पळून गेला आणि हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला होता. त्यामुळे भारतीय जवानांचं हे मोठं यश समजलं जात आहे. चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. पुलवामा जिल्ह्यातील सिर्नू गावात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती आज पहाटे मिळाले होती. अतिरेकी असल्याची माहिती मिळताच जवानांनी ऑपरेशन सुरु केलं आणि अतिरेक्यांना घेरलं. अनेक तास सुरु असलेल्या या चकमकीत हिजबुल कमांडर जहूर ठोकरसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. यात एका जवानही शहीद झाला आहे. संघर्षात सहा नागरिकांचा मृत्यू पुलवामामध्ये एन्काऊंटरदरम्यान जवानांची स्थानिकांसोबत संघर्ष झाला. चकमकीचा विरोध करणाऱ्या नागरिकांनी जवानांवर दगडफेक केली. यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांनी गोळीबार केला. त्यामध्ये सहा स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला. या संघर्षानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. शिवाय काश्मीर खोरं आणि बनिहाल शहरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
आणखी वाचा























