Jammu and Kashmir : श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला; एका पोलिसासह 20 जण जखमी, एक नागरिक ठार
Jammu and Kashmir : श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका पोलिसासह 20 जण जखमी झाले असून एक नागरिक ठार झाला आहे.
Jammu and Kashmir : श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला झाला आहे. या हल्यात एका पोलिसासह 20 जण जखमी झाले आहेत. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. श्रीनगरमधील हरि सिंह हाय स्ट्रीट भागात हा हल्ला झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान श्रीनगरमधील हरि हाय स्ट्रीट भागातील अमृता कादल मार्केटमध्ये हा हल्ला झाला आहे. ग्रेनेडचा नेम चुकल्यामुळे ग्रेनेड दुसरीकडे फुटला. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
Jammu and Kashmir: Several injured including police personnel in a grenade attack at Amira Kadal market, Srinagar. All the injured have been shifted to hospital: Police pic.twitter.com/mfhDhlKD2v
— ANI (@ANI) March 6, 2022
दरम्यान, शनिवारी जम्मू- काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दहशतवादी लपून बसले होते. येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. दोन अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर, एक एके-47 मॅगझिन, इन्सास रायफलच्या 48 गोळ्या, एके-47 चे दहा राउंड, 9 एमएम शस्त्राचे 38 राउंड, चिनी पिस्तुलचे दोन राउंड, एक चाकू आणि आणखी एक धारदार शस्त्र जप्त करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या
- Ukraine Russia War : रशियाकडून युक्रेनमधील नागरी विमानतळ उद्ध्वस्त; व्होदिमर झेलेन्स्कींचा दावा
- Russia Ukraine War: Russia Ukraine War: अमेरिका आणि पोलंडमध्ये मोठा करार! रशियाविरुद्ध लढा देण्यासाठी युक्रेनला मिळणार लढाऊ विमाने
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येऊ शकते? जाणून घ्या शक्यता
- Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल