एक्स्प्लोर

दगडफेकीनंतर काश्मीरमध्ये शाळा-महाविद्यालये बंद

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील तणाव पाहता आज सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय इंटरनेट आणि मोबाईल सेवाही बंद करण्यात आली आहे. फुटीरतावाद्यांनी आजही विरोध प्रदर्शन करण्याची घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. हळूहळू पूर्वपदावर येत असलेलं काश्मीर पुन्हा एकदा धुमसतंय. यावेळी विद्यार्थ्यांना भडकावून भारतीय जवानांवर दगडफेक करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. शिवाय आयसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडेही दाखवले जात आहेत. श्रीनगरमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आणि लष्कराला अश्रूधुराचा वापर करावा लागला. मात्र अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर विद्यार्थ्यांनी जवानांवर दगडफेक केली. हिंसाचाराला जबाबदार कोण? काश्मीर घाटीमध्येच वारंवार दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना वारंवार का घडत आहेत, असा सवाल निर्माण होत आहे. सीआरपीएफचे आयजी ऑपरेशन्स जुल्फिकार हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनांना दहशतवादी आणि त्यांचे समर्थक जबाबदार आहेत. अनेक ठिकाणी दहशतवादी आणि त्यांच्या भूमीगत समर्थकांचा दबाव नागरिकांवर आहे. पोलीस किंवा सीआरपीएफकडून कारवाई केली जाते, तेव्हा दहशतवाद्यांचे समर्थक जवानांवर दगडफेक करण्यासाठी नागरिकांवर दबाव टाकतात. यामुळे आमच्या कारवाईत अडथळा येतो, असं जुल्फिकार हसन यांनी सांगितलं. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी संरक्षण सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेऊन काश्मीरच्या सद्य परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. शिवाय गुप्तचर यंत्रणेने महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार दहशतवाद्यांनी जवानांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा व्यवस्थांनी पेट्रोल बॉम्बचे हल्ले रोखण्यासाठी रणनिती आखली आहे. सुरक्षा व्यवस्थांकडून प्रत्येक व्हॉट्सअॅप ग्रुपवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर दगडफेक करणाऱ्यांपैकी अशा आंदोलनकर्त्यांवर नजर ठेवली जात आहे, जे विविध आंदोलनात सहभागी असतात. संबंधित बातम्या :

श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवरील दगडफेकीला उत्तर देण्यासाठी 'प्लॅन बी' तयार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget