एक्स्प्लोर
जम्मू-काश्मीर : चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
बारामुला जिल्ह्यातील राफियाबादच्या दुरसू गावात दहशतवाद्यांना घेरलं होतं. यापूर्वीही एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं होतं.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामुला आणि शोपिया जिल्ह्यातील दोन चकमकींमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर एक जवानही या घटनेत शहीद झाला. बारामुला जिल्ह्यातील राफियाबादच्या दुरसू गावात दहशतवाद्यांना घेरलं होतं. यापूर्वीही एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं होतं.
लष्कर ए तोयबाचे दहशतवादी
सर्च ऑपरेशन सुरु असतानाच दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु करण्यात आला. या चकमकीत लष्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले, ज्यांची ओळख रियाज अहमद डार आणि खुर्शीद अहमद मलिक या नावाने करण्यात आली आहे. इतर दोन दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. चारही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, कुपवाडा जिल्ह्यातही दोन दिवसांपूर्वीच दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. खुमरियाल भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून त्यांच्याकडीन शस्त्रही जप्त करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
विश्व
कोल्हापूर
Advertisement