एक्स्प्लोर

Bhankrota Fire Accident: जयपूरमध्ये सीएनजी ट्रकचा स्फोट, 6 जणांचा होरपळून मृत्यू, तर 50 जण जखमी, नेमकं काय घडलं?

Ajmer-Jaipur Highway Fire Accident: जयपूरमध्ये सीएनजी ट्रकचा स्फोट आणि धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले. मदतकार्य सुरू आहे.

Bhankrota Fire Accident: जयपूरमधील पेट्रोल पंपाजवळ एलपीजी ट्रक आणि सीएनजी ट्रक यांच्यात भीषण अफपघात झाला. अपघातानंतर स्फोट होऊन आग पसरली. एकामागून एक 40 हून अधिक वाहने या भीषण अपघातात जळून खाक झाली. एवढेच नाही तर एका बसलाही धडक दिली, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या बसमध्ये प्रवास करणारे 6 प्रवासी जिवंत जळाले, तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारांसाठी जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निष्काळजीपणामुळे ही भीषण घटना घडली आहे. सीएनजी टँकर चुकीच्या बाजूने येत होता आणि एलपीजी ट्रकला धडकला. केवळ याच एका निष्काळजीपणामुळे एवढा मोठा अपघात घडला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एक वाहन वळण घेत असताना समोरून दुसरा ट्रक आला आणि त्याची भिंत तुटल्याने दोन्ही वाहनांची धडक झाली. त्यांनी सांगितले की ते पहाटे 5.55 पासून घटनास्थळी आहेत आणि पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. या आगीत भरधाव वेगाने येणारी अनेक वाहने जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले.

जयपूरमध्ये सीएनजी ट्रकची दुसऱ्या ट्रकला भीषण धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. आज (शुक्रवारी) सकाळी जयपूरमध्ये भीषण अपघात झाला. त्यावेळी झालेल्या मोठ्या स्फोटामध्ये सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. जयपूरमधील अजमेर रोडजवळ एका सीएनजी ट्रकची दुसऱ्या ट्रकला टक्कर धडक बसली, त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि स्फोट झाला. या अपघातात 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर 40 वाहनेही जळून खाक झाली. या वाहनांमधील प्रवाशांनी आपला जीव वाचवला.

जयपूरच्या भांकरोटा भागात पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन विभाग आणि पोलिसांच्या पथकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी धाव घेतली. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या कित्येक तास आग विझवण्याचा प्रयत्न करत होत्या. काहींनी वाहनातून बाहेर पडून आपला जीव वाचवला तर 6 जणांचा  आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

अपघात कसा झाला?

आज (शुक्रवारी) पहाटे 5.00 वाजता धुक्यामुळे दृश्यमानता देखील लक्षणीयरीत्या कमी असते. अशा परिस्थितीत महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना वेग आणि सुरक्षितता राखणे अवघड होऊन बसते. जयपूरमध्येही या अपघातात असाच काहीसा प्रकार घडला असण्याची भीती व्यक्त होत आहे. दोन ट्रक एकमेकांना धडकले, त्यातील एक सीएनजी ट्रक होता. या धडकेनंतर भीषण स्फोट झाला आणि सर्वत्र आग पसरली. या अपघातानंतर मागून येणारी वाहनेही एकामागून एक येऊन धडकली.

अपघातामुळे रस्ता वळवला

पोलिस आणि प्रशासनाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्या आहेत. दरम्यान, या अपघातामुळे आजूबाजूचा रस्ता दुतर्फा झाला आहे.अपघातात जळालेल्या वाहनांमध्ये अनेक ट्रक, प्रवासी बस, गॅस टँकर, कार, पिकअप, बाइक आणि टेम्पोचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा घटनास्थळी 

जयपूर अजमेर द्रुतगती मार्गावर झालेल्या या भीषण अपघाताची मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दखल घेतली आहे. सीएम भजनलाल शर्मा घटनास्थळी पोहोचले आणि अपघाताची संपूर्ण माहिती घेतली. अधिकाऱ्यांना अपघात ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री भजनलाल यांनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी स्वत: जयपूरमधील एसएमएस हॉस्पिटल गाठले आणि जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले की, जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर गॅस टँकरला लागलेल्या आगीच्या घटनेत नागरिकांच्या मृत्यूची दुःखद बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले आहे.घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटलमध्ये एसएमएस जाऊन डॉक्टरांना तातडीने आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि जखमींची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas Paithan Speech : मगरपट्टा सिटीतील फ्लॅट ते करुणा शर्मावर भाष्य, पैठणमधील आक्रमक भाषणMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 09 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
ZP School : जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
मोठी बातमी: वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी, झोप पूर्ण होत नसल्याने...
ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी, कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत; आका शंभर टक्के 302 चा आरोपी, जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे; सुरेश धसांचा हल्लाबोल
ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी, कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत; आका शंभर टक्के 302 चा आरोपी, जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे; सुरेश धसांचा हल्लाबोल
Embed widget