(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi : राहुल गांधी उत्तरेतील आईचा वारसा चालवणार; दक्षिणेतील वायनाड सोडून रायबरेलीची खासदारकी राखण्याचा निर्णय
Rahul Gandhi : राहुल यांच्या रायबरेलीत राहण्याच्या संमतीमागे आई सोनियांचे भावनिक आवाहन आहे, ज्यात त्यांनी 'मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे.' असे म्हटले होते.
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी आई सोनियांची जागा रायबरेलीतून खासदारकी ठेवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ते वायनाड सोडू शकतात. काँग्रेसच्या पहिल्या बैठकीनंतर आणि कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी राहुल यांना काँग्रेससाठी यूपी खूप महत्त्वाचं असल्याचं समजावून सांगितलं. प्रियांका गांधी पुन्हा यूपी राज्य प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारू शकतात, असेही बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी हे पद सोडले होते. राहुल यांनी जागा सोडल्यास प्रियंका वायनाडमधून पोटनिवडणूक लढवू शकतात. या माध्यमातून गांधी कुटुंबाला उत्तरेसह दक्षिणेवर आपली पकड मजबूत करायची आहे.
राहुल यांच्या रायबरेलीत राहण्याच्या संमतीमागे आई सोनियांचे भावनिक आवाहन आहे, ज्यात त्यांनी 'मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवत आहे.' असे म्हटले होते.
रायबरेली का महत्त्वाची आहे?
पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आई सोनिया, बहीण प्रियंका आणि रॉबर्ट वाड्रा यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी रायबरेली न सोडण्याचे मान्य केले. अमेठीची गमावलेली जागाही कुटुंबाला परत मिळाल्यामुळे रायबरेलीतील विजय आणखी मोठा असल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले. वायनाडपेक्षा राहुल यांना रायबरेलीमध्ये मोठा विजय मिळाला. अशा परिस्थितीत तुम्ही रायबरेली सोडल्यास उत्तर प्रदेशात चुकीचा संदेश जाईल. एवढेच नाही तर गांधी घराण्याच्या प्रमुखांनी नेहमीच यूपीमधूनच राजकारण केले. वडील राजीव गांधी अमेठीतून, तर आजोबा जवाहरलाल नेहरू यांनी अलाहाबादमधून निवडणूक लढवली आहे. रायबरेली ही त्यांची आई सोनिया, आजी इंदिरा गांधी आणि आजोबा फिरोज गांधी यांची जागा आहे.
राहुल यांनी वायनाड सोडू नये, अशी प्रियंका गांधी गोटातून इच्छा
प्रियाका गांधी यांच्या गोटातील काही लोकांची पूर्वीप्रमाणेच राहुल यांनी वायनाडमध्ये राहावे आणि प्रियांकाने रायबरेलीतून पोटनिवडणूक लढवावी, अशी अपेक्षा असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. खरे तर, नामांकनाच्या एक दिवस आधी, राहुल रायबरेलीतून निवडणूक लढवणार, असे गांधी परिवाराने ठरवले होते. प्रियांका आणि रॉबर्ट वाड्रा या दोघांनाही निवडणूक लढवायची असल्याने अखेरच्या क्षणी हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रियंका यांना समजावून सांगितले की, घराणेशाहीच्या आरोपांमुळे काँग्रेस कमकुवत होईल. संपूर्ण कुटुंब निवडणूक लढविण्याऐवजी राहुल ब्रँड करणे आवश्यक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या