एक्स्प्लोर

Mission Prarambh : ISRO पहिल्यांदाच खाजगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणार, जाणून घ्या काय आहे 'मिशन'?

Skyroot Aerospace: याचे प्रक्षेपण 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता इस्रोच्या श्रीहरिकोटा येथून केले जाईल.

Mission Prarambh : भारतातील पहिले खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट विक्रम-S (Vikram-S) प्रक्षेपणासाठी सज्ज असून देशात पहिल्यांदाच इस्रो (ISRO) अशाप्रकारचे रॉकेट प्रक्षेपित होणार आहे. याचे प्रक्षेपण 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता इस्रोच्या श्रीहरिकोटा येथून केले जाईल. हे रॉकेट हैदराबादस्थित कंपनी स्कायरूट एरोस्पेसने बनवले असून त्यात तीन पेलोड असतील. या मिशनला 'प्रारंभ' (Mission Prarambh) असे नाव देण्यात आले आहे. विक्रम-एस असे या रॉकेटचे नाव असून देशातील अंतराळ विज्ञानाच्या इतिहासातील हा एक 'टर्निंग पॉइंट' बोलण्यात येतोय. विक्रम-एस रॉकेटचे हे चाचणी उड्डाण असेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

प्रथमच एका खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित होणार

देशात प्रथमच एका खाजगी अंतराळ कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित होणार आहे. श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून हे प्रक्षेपण होणार आहे. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस कंपनीने हे रॉकेट बनवले आहे. कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक पवन कुमार चंदना यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ही चाचणी उड्डाण आहे. इस्रोने 18 नोव्हेंबर 2022 रोजी याच्या उड्डाणासाठी प्रक्षेपण विंडो निश्चित केली आहे.  पवन यांनी सांगितले की, हवामानाच्या अंदाजानुसार हे रॉकेट लॉन्च केले जाईल. विक्रम-एस असे या रॉकेटचे नाव आहे. ज्याला प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ आणि इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले आहे. या प्रक्षेपणाला 'मिशन प्रारंभ' असे नाव देण्यात आले आहे. 

रॉकेट प्रक्षेपित करणारी पहिली खाजगी अंतराळ कंपनी

या मोहिमेसोबतच, हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करणारी पहिली खाजगी अंतराळ कंपनी बनणार आहे. याला ऐतिहासिकही म्हणता येईल, कारण या मोहिमेमुळे अवकाश क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मिशन सुरू करण्यासाठी या क्षेत्राला प्रेरित करत आहेत.

स्कायरूट आणि इस्रो यांच्यात करार 
या प्रक्षेपणासाठी स्कायरूट आणि इस्रो यांच्यात करार झाला आहे. स्कायरूटचे सीओओ आणि सह-संस्थापक नागा भारत डाका यांनी सांगितले की, विक्रम-एस रॉकेट हे सिंगल-स्टेज सब-ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल आहे. जे त्याच्यासोबत तीन पेलोड घेऊन जात आहे. ही एक प्रकारची चाचणी आहे. त्यात यश आल्यास खासगी अंतराळ कंपनीच्या रॉकेट प्रक्षेपणाच्या बाबतीत भारत जागतिक आघाडीच्या देशांमध्ये सामील होईल.

विक्रम-एस काय आहे?

विक्रम-एस हे सिंगल स्टेज रॉकेट आहे, जे सब-ऑर्बिटल प्रक्षेपण रॉकेट आहे. जे श्रीहरिकोटा येथून तीन पेलोडसह उड्डाण करेल. स्कायरूट एरोस्पेसने अवकाश कार्यक्रमाचे जनक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावावरून रॉकेटचे नाव विक्रम ठेवले आहे. ही कंपनी व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी अत्याधुनिक प्रक्षेपण वाहने तयार करते.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lonavala Crime News: रायफलीतून चुकून गोळी सुटल्याचा बनाव; आजोबांनीच नातवावर झाडल्या गोळ्या..., लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू, अभय मराठे मृत्यू प्रकरणात हादरवणारा ट्विस्ट
रायफलीतून चुकून गोळी सुटल्याचा बनाव; आजोबांनीच नातवावर झाडल्या गोळ्या..., लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू, अभय मराठे मृत्यू प्रकरणात हादरवणारा ट्विस्ट
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
Devendra Fadnavis: शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
Embed widget