ISRO Solar Mission : चंद्रानंतर इस्रोची सोलर मोहिम! आदित्य L-1 आणि गगनयान; ISROच्या भविष्यातील मोहिमांबाबत जाणून घ्या...
Aditya L-1, Mangalyaan, Gaganyaan, Astrosat-2 Launch : चांद्रयान 3, आदित्य एल 1 यासह भारताकडून अनेक अंतराळ मोहिमा राबवण्यात येणार आहे. इस्रोच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत जाणून घ्या.
ISRO Future Space Missions : इस्रोकडून (ISRO) लवकर चंद्रमोहिमेतील (Moon Mission) तिसरी चंद्र मोहिम हाती घेण्यात येणार आहे. चांद्रयान 3 पुढील आठवड्यात प्रक्षेपित केलं जाईल. इस्रोकडून अंतराळातील रहस्य उलगडण्यासाठी अनेक मोहिम राबवल्या जात आहेत. चांद्रयान 3, आदित्य एल 1 यासह भारताकडून अनेक अंतराळ मोहिमा राबवण्यात येणार आहे. इस्रोच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत जाणून घ्या.
आदित्य एल 1 (Aditya L-1)
चंद्रानंतर आता भारत सूर्याचा अभ्यास करण्यासाठीही महत्त्वाची मोहिम हाती घेणार आहे. आदित्य एल 1 हे सूर्याचा अभ्यास करणाऱ्यासाठीची भारताची पहिली अंतराळ मोहिम असणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोच्या पहिल्या अंतराळ मोहिमे अंतर्गत 'आदित्य L1' हे अंतराळयान अवकाशात पाठवलं जाईल. आदित्य L1 द्वारे विजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ' (VELC) उपकरण अंतराळात पाठवलं जाईल. चांद्रयान 3 नंतर इस्रो आदित्य एल 1 प्रक्षेपित करण्याची शक्यता आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (IIA) च्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CREST) कडून VELC तयार करण्यात आलं असून ते इस्रोकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.
गगनयान मोहिम (Gaganyaan Mission)
इस्रोकडून 2023 मध्ये गगनयानही महत्त्वपूर्ण मोहिम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मानवयुक्त अंतराळयान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. गगनयान 5 ते 7 दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरेल. या मोहिमे अंतर्गात पाच ते सात दिवसांसाठी तीन सदस्यीय क्रू अंतराळात पाठविण्याची संकल्पना आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत तीन अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाणार आहेत. या तीन मोहिमांपैकी 2 मानवरहित असतील, तर एक मानवयुक्त मोहीम असेल.
मंगळयान 2 (Mangalyaan 2)
मंगलयान 2 हे ऑर्बिटर मिशन आहे. मार्स ऑर्बिटर मिशन 1 च्या मार्स ऑर्बिटर मिशन 2 म्हणजे मंगळयान 2 ची घोषणा करण्यात आली होती. 2025 मध्ये मंगलयान 2 अंतराळात पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे या मोहिमेला उशीरा झाला. आता यावर काम सुरु करण्यात सुरु आहे.
अॅस्ट्रोसॅट 2 (AstroSat 2)
इस्रोकडून अॅस्ट्रोसॅट - 2 अंतराळात पाठवण्यात येणार आहे. इस्रोने 7 वर्षांपूर्वी 2015 मध्ये अॅस्ट्रोसॅट उपग्रह पाठवण्यात आला होता. सात वर्षानंतरही अॅस्ट्रोसॅट उपग्रह व्यवस्थित काम करत आहे. आता त्याची पुढील अपडेट अॅस्ट्रोसॅट - 2 पाठवण्यात येणार आहे. अॅस्ट्रोसॅट - 2 च्या प्रक्षेपणाबाबत अपडेट किंवा अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, या मोहिमेवरही इस्रोकडूनकाम सुरु आहे.
लुप्लेक्स (LUPEX-Lunar Polar Exploration Mission)
भारत आणि जपानकडून संयुक्तपणे लुप्लेक्स अंतराळ मोहिम राबवण्यात येणार आहे. जपानमधील JAXA अंतराळ संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेट इस्रो संयुक्तपणे ल्युनिअर पोलार मिशनवर काम करणार आहेत. चंद्रावर असलेल्या जलस्रोतांचे प्रमाण आणि स्वरूप पाहणे, हा या अंतराळ मिशनचा प्रमुख उद्देश आहे. भविष्यातील अंतराळ संशोधन मिशनमध्ये या जलस्रोतांचा वापर करण्यासाठी LUPEX मिशनचं यश महत्वाचं आहे. 2025 मध्ये ही मोहिम राबवण्यात येणार आहे.