Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
इस्रायलने हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन युनिटच्या कमांडरना ठार केले आहे. इस्त्रायलवर जागतिक पातळीवरून युद्ध थांबवण्यासाठी दबाव असतानाही हल्ले सुरुच ठेवले आहेत.
Israel Hezbollah conflict : इस्रायल आणि लेबनॉनमध्ये (Israel–Hezbollah conflict) गेल्या 8 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या (lebanon war) क्षेपणास्त्र आणि ड्रोन युनिटच्या कमांडरना ठार केले आहे. इस्त्रायलवर जागतिक पातळीवरून युद्ध थांबवण्यासाठी दबाव असतानाही हल्ले सुरुच ठेवले आहेत. दरम्यान, इस्रायलमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाला एअर ॲम्ब्युलन्सने भारतात आणण्यात आले. हवालदार सुरेश आर (वय 33) असे या जवानाचे नाव आहे. गेल्या 30 दिवसांपासून ते इस्रायलमधील रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे ठिकाण आणि लोक त्यांना ओळखता येत नव्हते. दुखापतीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
युनायटेड नेशन्स मिशन UNDOF मध्ये सुरेश यांचा सहभाग
इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्समध्ये युनायटेड नेशन्स मिशन UNDOF मध्ये सुरेश यांचा सहभाग होता. UNDOF एक शांतता अभियान आहे, ज्याचे कार्य इस्रायल आणि सीरिया यांच्यातील युद्धविराम राखणे आणि दोन्ही देशांच्या सैन्यांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणे आहे. गोलान हाइट्स व्यतिरिक्त 900 भारतीय सैनिकही लेबनॉनमध्ये आहेत. ते UNIFIL मध्ये समाविष्ट आहेत ज्यांचे काम लेबनॉन आणि इस्रायलमध्ये शांतता राखणे आहे.
युद्धाच्या काळात भारतीय सैनिक इस्रायल सीमेवर काय करत आहेत?
इस्रायल-लेबनॉन युद्ध थांबवण्यासाठी भारतीय सैनिक तैनात होते तो काळ मार्च 1978 होता. लेबनॉनमध्ये उपस्थित असलेल्या पॅलेस्टिनी समर्थक अतिरेक्यांनी डझनभर ज्यूंची क्रूरपणे हत्या केली. या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. जेव्हा हे प्रकरण संयुक्त राष्ट्रात पोहोचले तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीने या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा ठराव मंजूर केला. या प्रस्तावानुसार इस्रायली सैन्याला लेबनॉन सीमेवरून तत्काळ माघार घेण्यास सांगण्यात आले. इस्त्रायली सैन्याने ज्या ठिकाणाहून माघार घेतली होती ती जागा UN ने आपल्या ताब्यात घेतली होती. तेव्हापासून हा भाग संयुक्त राष्ट्रांच्या ताब्यात आहे. या भागात शांतता राखण्यासाठी UN ने आंतरराष्ट्रीय सैन्य तैनात केले होते.
UN शांतता मोहिमेत 48 देशांचे सुमारे 10,500 शांती सैनिक
या सैनिकांना युनायटेड नेशन्स अंतरिम फोर्स म्हणजेच UNIFIL म्हणतात. UNIFIL 1978 पासून येथे तैनात आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांचे सैन्य तैनात असलेल्या 110 किलोमीटर क्षेत्राला 'ब्लू लाइन' म्हणतात. हा दोन्ही देशांमधील बफर झोन आहे.सध्या UN शांतता मोहिमेत 48 देशांचे सुमारे 10,500 शांती सैनिक आहेत. सध्या दक्षिण लेबनॉनमधील इस्रायल सीमेजवळ भारताचे 900 शांती सैनिकही तैनात आहेत.
यूएन पीस मेकर्स काय आहेत आणि ते कधी तयार झाले?
भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांचे प्राण वाचवले तेव्हा 1999 मध्ये निवृत्त मेजर जनरल राजपाल पुनिया यूएन पीस मिशनमध्ये दक्षिण आफ्रिकेतील सिएरा लिओन येथे मिशनसाठी गेले होते. येथे शांतता राखण्यासाठी त्यांना स्थानिक छोट्या दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाया कराव्या लागल्या. सरकारवर दबाव आणण्यासाठी या दहशतवादी संघटना अनेकदा येथे हिंसाचार करत असत.
जेव्हा भारतीय लष्कराला पाकिस्तानी सैनिकांनी सॅल्यूट केला
पुनिया यांच्या म्हणण्यानुसार, यूएनचे हे मिशन इतके धोकादायक होते की, 16 देशांच्या सैनिकांनी शस्त्रे टाकली होती. यानंतर हे मिशन पूर्ण करण्याची जबाबदारी यूएनने भारतीय लष्कराकडे सोपवली होती. भारतीय जवानांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण कंपनीला दहशतवाद्यांनी घेरले आणि शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले. भारतीय सैनिकांनी शस्त्र न ठेवण्याचा निर्णय घेतला. दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवले होते. कोणताही मार्ग शिल्लक नसताना भारतीय जवानांनी कारवाई सुरू करून पाकिस्तानी सैनिकांना वाचवले. या पाकिस्तानी सैनिकांनी मिशनवरून परतण्यापूर्वी भारतीय लष्कराला सॅल्यूट केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या