Wrestlers Protest: कुस्तीपटूंचा 'काळा दिवस', बृजभूषण सिंह यांना विरोध कायम
Wrestlers Protest: दिल्लीतील जंतर-मंतर या ठिकाणी बृजभूषण सिंहांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. कुस्तीपटूंनी सध्या ट्विटरवर काळा दिवस साजरा केला असल्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
Wrestlers Protest: भाजपाचे आमदार तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अटकेची मागणी करत जंतर-मंतर या ठिकाणी सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आजचा 19 वां दिवस आहे. जतंर-मंतर (Jantar Mantar) याठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला कुस्तीपटू भाजपा आमदारांच्या विरोधात काळा दिवस (Black Day) म्हणून साजरा करत आहेत. कुस्तीपटूंची विरोधाची ही पद्धत सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. सोशल मिडीयावर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बऱ्याच प्रतिक्रिया देखील येत आहेत. तसेच कुस्तीपटूंच्या भूमिकेबद्दल देखील लोकं आपली मतं मांडताना दिसत आहेत. तर काही लोकं या आंदोलनाच्या आणि 'काळा दिवस' साजरा करण्याच्या भूमिकेविरुद्ध देखील प्रतिक्रिया देत आहेत.
19 दिन से गर्मी में आपके चैंपियन सड़क पर बैठे हैं। माँग रहे हैं बहन बेटियों के लिए इंसाफ़। आप भी ट्वीट करें। #Black_Day_11_May pic.twitter.com/mj56kYrUIw
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) May 11, 2023
खरतर कुस्तीपटूंनी गुरुवारी बृजभूषण सिंहाविरोधात काळा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. आज कुस्तीपटू स्वत: काळी पट्टी बांधून आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंनी लोकांना हा काळा दिवस साजरा करण्यासाठी समर्थन करण्याचे आवाहन देखील केले आहे. कुस्तीपटूंच्या या भूमिकेचे पडसाद सोशल मिडीयावर पहायला मिळत आहेत. सध्या सोशल मिडीयावर काळा दिवस चांगलाच चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंनी काळा दिवस साजरा करत असल्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे.
Black Day⚫️🔙#balckday #wrestlersprotest #istandwithmychampions pic.twitter.com/SnQPHPB7a6
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) May 11, 2023
कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा 19 वा दिवस
बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशातील महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, 18 जानेवारी 2023 रोजी कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाचा आजचा 19 वा दिवस आहे. या आंदोलनात सामील झालेल्या सात कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याची चौकशी करण्यासाठी दोन समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे.