एक्स्प्लोर

INS Mormugao : नौदलात सामील होणार शक्तिशाली INS मुरमुगाव! आधुनिक युद्धनौकाची वैशिष्ट्ये जाणून घ्या

INS Mormugao : हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या (China) वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS मुरमुगाव सामील करण्यात येणार आहे.

INS Mormugao : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh)भारतीय नौदलात मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे अत्याधुनिक स्टेल्थ गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर मुरमुगाव (INS Mormugao) दाखल करतील. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या (China) वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS मुरमुगाव रविवारी (18 डिसेंबर) भारतीय नौदलात सामील करण्यात येणार आहे. भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, ही युद्धनौका रिमोट सेन्सर मशीन, आधुनिक रडार, जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यासारख्या शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.

2025 पर्यंत आणखी दोन युद्धनौका
नौदलाच्या प्रकल्प-15B अंतर्गत मुरमुगाव ही दुसरी युद्धनौका आहे, ज्याअंतर्गत 2025 पर्यंत आणखी दोन युद्धनौका देण्यात येणार आहेत. नौदलाच्या आधुनिकीकरणाशी परिचित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिली P-15B युद्धनौका गेल्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत कार्यान्वित झाली. विशाखापट्टणम-क्लास डिस्ट्रॉयर्सची रचना ही नौदलाची इन-हाउस संस्था वॉरशिप डिझाईन ब्युरोने केली आहे.

प्राणघातक युद्धनौकांमध्ये याची गणना
नौदलाने सांगितले की, या युद्धनौकेची लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7,400 टन आहे. भारतात बांधलेल्या सर्वात प्राणघातक युद्धनौकांमध्ये याची गणना केली जाऊ शकते.

मुरमुगाव नाव कसे पडले?
गोव्याच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेल्या मुरमुगाव या ऐतिहासिक बंदर शहरावरून हे नाव पडले आहे. हे जहाज प्रथम 19 डिसेंबर 2021 रोजी समुद्रात उतरले, त्याच दिवशी गोव्याने पोर्तुगीज राजवटीपासून मुक्तीची 60 वर्षे पूर्ण केली. ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या स्वदेशी संस्थेने डिझाइन केले आहे.

75% पूर्णपणे स्वदेशी
ही युद्धनौका चार शक्तिशाली गॅस टर्बाइनद्वारे चालविली जाते. 30 नॉट्सपेक्षा जास्त वेग गाठण्यास सक्षम आहे. नौदलाने सांगितले की, या जहाजाची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता विकसित करण्यात आली असून यावर रॉकेट लाँचर, टॉर्पेडो लाँचर्स आणि एसएडब्ल्यू हेलिकॉप्टर बसवण्यात आले आहेत. हे जहाज आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धाच्या परिस्थितीत लढण्यास सक्षम आहे. नौदलाने सांगितले की, या जहाजाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सुमारे 75 टक्के हे पूर्णपणे स्वदेशी आहे. तसेच ते 'आत्मनिर्भर भारत' या राष्ट्रीय उद्दिष्टाखाली तयार करण्यात आले आहे.

एकूण 35,800 कोटी रुपये खर्च 
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर् नुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, नौदलामध्ये या जहाजाचा समावेश केल्याने हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षितेत वाढ होईल, तसेच नौदलाच्या ब्लू-वॉटर क्षमतेला चालना मिळेल. या जहाजाच्या निर्मितीसाठी एकूण 35,800 कोटी रुपये खर्च आला आहे. प्रकल्प-15B अंतर्गत MDL (माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड) येथे बांधण्यात येणाऱ्या 4 विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशकांपैकी मुरमुगाव हे दुसरे विनाशक आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयएनएस विशाखापट्टणम या नावाने अशा प्रकारचे पहिले विनाशक नौदलात दाखल झाले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Embed widget