34 वर्षाच्या गौरवशाली सेवेनंतर आयएनएस गोमती युद्धनौका सेवामुक्त
INS Gomati : आयएनएस गोमती या युद्धनौकेचे आज मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे समारंभपूर्वक सूर्यास्ताच्यावेळी डिकमशनिंग करण्यात आले.
INS Gomati : आयएनएस गोमती या युद्धनौकेचे आज मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे समारंभपूर्वक सूर्यास्ताच्यावेळी डिकमशनिंग करण्यात आले. यावेळी व्हाइस अडमिरल अजेंद्र बहादूर सिंह सोबत नौदल अधिकारी उपस्थित होते. आयएनएस गोमती ही P-16 वर्गाची गोदावरी श्रेणीची तिसरी युद्धनौका आहे. ही युद्धनौका 16 एप्रिल 1988 साली मुंबईच्या माझगाव डॉकयार्ड येथे कमिशनिंग होऊन भारतीय नौदलात दाखल झाली होती. 34 वर्षे गौरवशाली सेवा पूर्ण केल्यानंतर आज ही युद्ध नौका सेवामुक्त झाली.
या युद्धनौकेने ऑपरेशन कॅक्टस, पराक्रम आणि इंद्रधनुष्य आणि अनेक द्विपक्षीय आणि बहुराष्ट्रीय नौदल सरावांमध्ये भाग घेतला आहे. आयएनएस गोमती ही त्या काळातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान असलेली युद्धनौका म्हणून तिची ओळख होती. सेन्सर आणि शस्त्राचा एकत्रित वापर या युद्धनौकेमध्ये केला गेला होता. शिवाय दोन हेलिकॉप्टर एका वेळेस लँड होतील किंवा वाहून नेले जातील अशा प्रकारची तिच्या आकाराची पहिली फ्रिगेट होती
राष्ट्रीय सागरी सुरक्षेतील तिच्या उल्लेखनीय कामगिरी आणि उत्कृष्ट योगदानासाठी या युद्धनौकेला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. आयएनएस गोमती सेवा मुक्त झाल्यानंतर या युद्धनौकेचा वारसा लखनौमधील गोमती नदीच्या नयनरम्य किनार्यावर उभारल्या जाणार्या खुल्या संग्रहालयात जिवंत ठेवला जाईल. तसेच या युद्धनौकेच्या अनेक लढाऊ यंत्रणा लष्करी आणि युद्ध अवशेष म्हणून प्रदर्शित केल्या जातील.
ही आहेत वैशिष्ट्ये
वजन - 3,860 टन
लांबी - 126.5 मी
रुंदी - 14.5 मी
वेग - 27 नॉटिकल मैल/तास
क्षमता - 313 व्यक्ती
- अँटी शिप एअर मिसाइल सिस्टीम, 76 मिमी तोफा, सोनार मिसाईल सिस्टीम, ई-बँड रडारने सुसज्ज
- दोन लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केले जाऊ शकतात.
- 19 मार्च 1984 रोजी लाँच केले
- 16 एप्रिल 1988 रोजी नियुक्त केले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Jammu Kashmir : कशासाठी शिक्षणासाठी... शाळेत जाण्यासाठी एका पायाने 2 किमीचा प्रवास, दिव्यांग मुलाची ह्रद्यद्रावक कहाणी
PMLA Case: कर्नाटक काँग्रेसचे डॅशिंग प्रदेशाध्यक्ष आता ED च्या जाळ्यात? मनी लॉंड्रिंग प्रकरणी चार्जशीट दाखल