एक्स्प्लोर

Jammu Kashmir : कशासाठी शिक्षणासाठी... शाळेत जाण्यासाठी एका पायाने 2 किमीचा प्रवास, दिव्यांग मुलाची ह्रद्यद्रावक कहाणी

Jammu Kashmir : एक पाय नसला तरी परवेझने आपल्या स्वप्नांना मुरड घातली नाही. उलट आणखी जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो रोज दोन किलोमीटर चालत जातो आणि परत दोन किलोमोटीर चालत शाळेतून घरी येतो

Jammu Kashmir : सर्व अवयव व्यवस्थित असताना देखील अनेक वेळा काही लोकांकडून फक्त कारणे सांगितली जातात. परंतु, समाजात अशा अनेक दिव्यांग व्यक्ती आहेत, ज्या एखादा अवयव कमी असला तरी त्यावर रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संकटाचा कोणतेही कारण न सांगता सामना करत असतात. अशीच एक कहाणी आहे जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथील एका तरूणाची. या तरूणाला एक पाय नाही. परंतु, एकाच पायावर हा तरूण रोज दोन किलोमीटर अंतर चालत शाळेला जातो. परवेझ अहमद हजाम (Parvez Ahmed Hajam) असे या तरूणाचे नाव आहे. 

कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम मावर गावातील परवेझ या तरूणाला एक पाय नाही. परंतु, असे असताना देखील अनेक अडचणींचा सामना करत हा तरूण रोज दोन किलोमीटर चालत शाळेत जातो. परवेझ हा सध्या 9 वीच्या वर्गात शिकत आहे. काश्मीरमध्ये उष्णतेसाठी प्रत्येक घरात शेकोटी केली जाते. 2009 ला परवेझच्या घरी देखील अशीच शेकोटी करण्यात आली होती. परंतु, या शेकोटीच्या आगीत परवेझ पूर्णपणे भाजला होता. कुटुंबीयांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले. परंतु, त्याचा एक पाय कापावा लागला, अशी माहिती त्याचे वडील गुलाम अहमद हजाम यांनी दिली.   
 
एका पायावर परवेझ रोज चार किलोमीटर अंतर चालतो
 
एक पाय नसला तरी परवेझने आपल्या स्वप्नांना मुरड घातली नाही. उलट आणखी जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो रोज दोन किलोमीटर चालत जातो आणि परत दोन किलोमोटीर चालत शाळेतून घरी येतो, असे रोज चार किलोमीटर अंतर तो एका पायावर चालतो. परवेझ याचे प्रथामिक शिक्षण सरकारी शाळेत झाले. परंतु, पाचवीनंतर त्याला आपल्या घरापासून दोन किलोमीटर असंर असलेल्या हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. शिक्षण विभागाने स्थानिक समाजकल्याण विभागामार्फत आवश्यक सहकार्य करून त्याला मोफत व्हील चेअर दिली. परंतु, गेल्या चार वर्षांपासून या व्हील चेअरची त्याला फारशी मदत झाली नाही.

परवेझ राहात असलेले गाव हे डोंगरांमध्ये असून त्याच्या गावातून शाळेपर्यंतचा रस्ता खराब आहे. त्यामुळे खराब रस्त्यावर व्हील चेअर चालवता येत नाही. डोंगराच्या उतारावरून वर आणि खाली येताना व्हील चेअरचा कोण सांभाळणार? असे परवेझ सांगतो. परवेझचे वडील सांगतात, मी एक मजूर असून माझे नऊ लोकांचे मोठे कुटुंब आहे. परंतु, मला माझ्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण द्यायचे आहे. त्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागतील आणि मी ते करेन.  

परवेझ खूप हुशार विद्यार्थी आहे
परवेझ हा अभ्यासात हुशार विद्यार्थी असून अभ्यासाशिवाय इतर उपक्रमांमध्ये देखील तो सहभाग घेत असतो. त्याच्या हायस्कूलचे शिक्षक एजाज अहमद सांगतात,  तो वर्गातीस सर्वात हुशार  विद्यार्थी असून त्याचा काय पहिला नंबर असतो. शिवाय वादविवाद आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यात नेहमीच तो आघाडीवर असतो. शारीरिकदृष्ट्या कमकुवत असूनही तो आमच्या शाळेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे."

एका पायावर चालत असताना त्याला इतर मुलांकडून खूप टोमणे आणि अपमानकारक बोलण्याचा सामना करावा लागतो. परंतु, परवेझच्या म्हणण्यानुसार, त्याने नेहमीच इतर विद्यार्थ्यांकडून मिळाऱ्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून शिक्षणावर केंद्रित केले आहे. सर्व अडचणींशी लढा देत परवेझने आतापर्यंत स्वत:ला सिद्ध  केले आहे. परंतु, परवेझची सरकारला एकच विनंती आहे की, त्याला कृत्रिम पाय किंवा असे काही साधन देण्यात यावे, ज्यामुळे त्याला शाळेत जाण्यास मदत होईल.

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget