CNG Plant : आशियातील सर्वात मोठा सीएनजी प्लांट भारतात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
PM Modi Will Inaugurate CNG Plant : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी, शनिवारी याचे उद्घाटन होणार आहेत. प्रशासनाकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.
PM Modi Will Inaugurate Indore CNG Plant : आशियातील सर्वात मोठा बायो सीएनजी प्लांट मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) इंदुर येथे उभा राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी, शनिवारी याचे उद्घाटन होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्चुअल कार्यक्रमात याचे उद्घाटन करणार आहेत. प्रशासनाकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंदूर येथील आशियातील सर्वात मोठ्या बायो सीएनजी गॅस प्लांटचे उद्घाटन करण्याचे आमंत्रण दिले होते.
इंदुर येथील ट्रेंचिंग ग्राउंड येथील 15 एकर जागेवर सीएनजी प्लांट उभारण्यात आला आहे. यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा आशियातील सर्वात मोठा बायो नॅचरल गॅस सीएनजी प्लांट आहे. या प्लांटमध्ये दररोज 17 ते 18 टन सीएनजी गॅस तयार हार आहे. तसेच 100 टन जैविक खताचेही उत्पादन होणार आहे, या खताचा वापर जैविक शेती करम्यासाठी करण्यात येणार आहे. एकूण तीन टप्प्यात गॅस तयार होणार आहे. पहिल्यांदा डायजेस्टर, त्यानंतर बॅलून आणि अखेरीस कंप्रेस्ड... अशा तीन टप्प्यात गॅसची निर्मिती होणार आहे. त्यानंतर शुद्ध मिथेन गॅस रिफिल सेंटरमध्ये पाईपलाईनच्या मदतीने पोहचवण्यात येईल.
400 बस मध्ये वापरण्यात येणार सीएनजी -
जिल्हा प्रशासन या सीएनजी गॅसचा वापर सार्वजनिक ट्रान्सपोर्टसह कॉरपोरेशनच्या बसमध्ये करेल. जवळपास 400 बसमध्ये सीएनजी गॅसचा वापर करण्यात येणार आहे. या प्लांटमधून शहरातील जवळपास 300 ते 400 बस चालवण्याचे उद्धिष्ट आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, या गॅस प्लांटमधून सरकारला बाजार किमतीपेक्षा पाच रुपये कमी किमतीत सीएनजी गॅस उपलब्ध होणार आहे. या प्लांटमुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल वाचणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी जैविक खताची निर्मितीही होणार आहे.
इंदौर की एक और उपलब्धि, जहाँ तैयार हो गया है 15 एकड़ में एशिया का सबसे बड़ा सीएनजी प्लांट, कचरे से बन रही हैं CNG, 19 फरवरी को @narendramodi करेंगे उद्घाटन @ABPNews @awasthis @SanjayBragta @OfficeofSSC @ChouhanShivraj @JansamparkMP pic.twitter.com/XoFY0LQjMN
— Brajesh Rajput (@brajeshabpnews) February 18, 2022