एक्स्प्लोर

Maldives : मे पर्यंत भारतीय सैनिक मालदीवमधून परतणार, मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा, आता भारताची पुढची भूमिका काय?

Maldives : मालदीवमध्ये तैनात असलेल्या सैनिकांची जागा भारतीय नागरिक घेतील, असा दावा मालदीव सरकारकडून करण्यात आला आहे.

मालदीव : मालदीवच्या (Maldives) परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला आहे की भारतीय सैनिक मे महिन्यापर्यंत माघारी जाईल. शनिवार 3 फेब्रुवारी रोजी मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत मालदीवमधून आपले सैन्य मागे घेईल हिंद महासागर द्वीपसमूहात तैनात असलेल्या सुमारे 80 सैनिकांची जागा आता भारतीय नागरिक घेतली.

द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या सहमतांचा दाखला देत मालदीवने सांगितले की, भारतीय सैनिकांचा पहिला गट 10 मार्चपर्यंत आणि उर्वरित 10 मेपर्यंत देश सोडेल. तसेच आता दोन्ही देशांमधील पुढील द्विपक्षीय बैठक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात माले येथे होणार असल्याची माहिती देखील यावेळी मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 

भारतीय सैनिकांची मोठी मदत 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांनी विमानसेवा सुरु ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, लष्कराच्या माघारीसाठी कोणत्याही कालमर्यादेचा उल्लेख मंत्रालयाने केलेला नाही. भारताचे म्हणणे आहे की,  मालदीवमध्ये तैनात भारतीय सैनिक, डझनभर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह, देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना मानवतावादी मदत आणि वैद्यकीय उपचार देतात.

मालदीव भारताच्या जवळचा

इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्यासाठी सध्या अनेक देश धडपडत आहे. त्याचसाठी चीनने देखील मालदीवला स्वतःकडे आकर्षित केले असल्याचं म्हटलं जातं. भारताच्या शेजारी असल्याने मालदीव अत्यंत जवळ आहे. त्यामुळे मालदीवमध्ये भारतीय सैनिक मालदीवमध्ये तैनात असते. तसेच मालदीवला  दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान दिले आहे, जे बहुतेक सागरी निरीक्षण, शोध आणि बचाव कार्य आणि वैद्यकीय सुविधांसाठी वापरले जातात. भारतीय सैनिक त्यांच्या ऑपरेशनचे व्यवस्थापन करतात.

भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये कटुता

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर त्यांच्या या फोटोंवर मालदीवच्या मंत्र्यांनी टीका केली. या सगळ्यानंतर मालदीव आणि भारतामध्ये बराच तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी त्यांची मालदीवची ट्रीप देखील रद्द केली. त्यामुळे मालदीवला आर्थिकदृष्ट्या बराच फटका बसला. दरम्यान या सगळ्यामध्ये मालदीव आणि चीनचे देखील संबंध वाढत गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि मालदीवच्या संबंधावर चर्चा सुरु झाली. तर आता मालदीवमधून भारताचे सैन्य देखील माघारी येणार असल्याचं समोर आलं आहे. 

ही बातमी वाचा : 

India Funds to Maldive : विरोधात भूमिका घेणाऱ्या मालदीवला भारताची भरभरून मदत; अर्थसंकल्पात मोठी घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Embed widget