Indian Law: मुलांप्रमाणे मुली करू शकतात का वडिलांच्या संपत्तीवर दावा? वाचा काय सांगतो कायदा...
Property dispute: जर मुलाने वडिलांची संपत्ती आपल्या किंवा आपल्या मुलांच्या नावे केली, तर बहीण संपत्तीवर दावा करु शकते का? हा प्रश्न अनेकांना पडतो, याचंच उत्तर आज जाणून घेऊया.
![Indian Law: मुलांप्रमाणे मुली करू शकतात का वडिलांच्या संपत्तीवर दावा? वाचा काय सांगतो कायदा... Indian Law Property dispute can daughters claim fathers property like sons see what the law says Indian Law: मुलांप्रमाणे मुली करू शकतात का वडिलांच्या संपत्तीवर दावा? वाचा काय सांगतो कायदा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/30/30ff142bd995b1c59596bedf1d0f33401690717730718332_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Property Legal Aid: बहुतांश घरात मालमत्तेवरुन वाद (Property Dispute) हे सर्रास सुरू असतात. कधी भावांमध्ये भांडणं होतात, तर कधी पिता-पुत्रांत. त्याच बरोबर आता मुलीही मालमत्तेवरील (Property) हक्काबाबत जागरूक होत आहेत, त्यामुळे भावांच्या डोक्याचं टेन्शन वाढलं आहे. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात मुलींनीही वडिलांकडे समान हक्क मागून संपत्तीवर आपला हक्क सांगितला आहे. अनेक मुलं आजही विचार करतात की, संपत्ती ही भावांमध्येच वाटून घेऊया. पण सतर्क आणि जागरुक मुली वडिलांच्या संपत्तीवर हक्क मागण्यासाठी येतात आणि घरात वाद होतो.
वडिलांच्या मालमत्तेच्या प्रकरणांशी संबंधित एक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो तो म्हणजे, जर एखाद्या मुलाने वडिलांची संपत्ती आपल्या किंवा आपल्या मुलांच्या नावे केली, तर बहीण संपत्तीवर दावा करु शकते का? याचंच उत्तर आज जाणून घेऊया.
मुली केव्हा संपत्तीवर हक्क सांगू शकत नाहीत?
कायद्यानुसार हे स्पष्ट आहे की, मुलींनाही वडिलांच्या मालमत्तेवर मुलांइतकाच अधिकार आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, जर वडील जिवंत असताना ते त्यांची मालमत्ता त्यांच्या नातवंडांच्या नावावर करत असतील तर त्यावर मुली दावा करू शकत नाहीत.
मृत्यूपत्र लिहल्यास आहे हे नियम
मात्र, वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्ता मृत्यूपत्राद्वारे मुलाच्या किंवा नातवंडांच्या नावावर झाली असल्यास त्याला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. म्हणजेच मृत्यूपत्र बनवलं असेल तरी मुली आपल्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगू शकतात आणि त्यासाठी कोर्टात जाऊ शकतात. मृत्यूपत्र न लिहिता वडिलांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मुलींना संपत्तीत समान अधिकार आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर आईलाही मालमत्तेत समान हक्क मिळतो.
जर मृत्यूपत्रातून एखाद्या मुलाला बेदखल केलं, तर त्याला बेदखल केल्याचं कारणही कोर्टाला देणं आवश्यक आहे. मालमत्तेतून बेदखल करण्यात आलेला व्यक्ती देखील कोर्टाचं दार ठोठावू शकतो आणि मालमत्तेत समान अधिकार मागू शकतो.
जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कमावलेल्या मालमत्तेबाबत बक्षिस पत्र लिहिलं असेल तर ते वैध मानलं जाईल. एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या नावावरील संपत्ती त्याची पत्नी आणि मुला-मुलींना समान हक्क मिळतो. मुलगा, मुलगी आणि आई हे सर्व वडिलांच्या मालमत्तेचे समान भागीदार असतात.
हेही वाचा:
ISRO Scientist Salary: इस्रोच्या प्रमुखांचा नेमका पगार किती? जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)