सिंध नदीत अडकलेल्या 4 जणांची लष्कराकडून सुटका
Trending News : भारतीय लष्कराच्या जवानांनी सिंध नदीत अडकेल्या वाहनात फसलेल्या चार जणांची सुखरुप सुटका केली. याचा व्हिडीओ सोश मीडियावर व्हायरल होत आहे.
Indian Army Rescue : भारतीय सैन्याचे जवान (Indian Army) सीमेवर शत्रूशी दोन हात करत देशाचं रक्षण करतातच त्याशिवाय देशातील अनेक रेस्क्यू ऑपरेशनमध्ये (Rescue Operation) अनेकांचे प्राणही वाचवतात. गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यानंतर लष्कराकडून परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जात आहे. यादरम्यान नुकतच लष्कराकडून सिंध नदीत अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू करताना पाहायला मिळाली.
या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय लष्कराचे जवान सिंध नदीत अडकलेल्या वाहनातील चार जणांना सुखरुप बाहेर काढलं. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सिंध नदीच्या प्रवाहात अक वाहन अडकलं आहे. या वाहनाती काही लोक अडकले आहेत. या अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं काम जवान करत आहेत.
#WATCH J&K | Indian Army rescues four people after their vehicle was stuck in Sind river near Baltal in Srinagar district
— ANI (@ANI) June 12, 2022
(Source: Indian Army) pic.twitter.com/raRYfSLUCg
भारतीय लष्कराच्या अहवालानुसार सोनमर्ग येथे चार जण सहलीसाठी आले होते. यादरम्यान बालटालजवळ सिंध नदी ओलांडण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी नदीत अडकली. त्यानंतर भारतीय लष्कराच्या बचाव पथकाने मदत करत त्यांना सुखरुप वाचवलं.
बालटाल-डोमेलमध्ये अमरनाथ यात्रेसाठी तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या बटालियनच्या गस्ती दलाला सिंध नदीत वाहन अडकल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. यानंतर, लष्कराच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी आज ईडीसमोर हजर राहणार; नेते-कार्यकर्त्यांना शक्तीप्रदर्शनाची परवानगी नाहीच
- Petrol-Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे आजचे दर जाहीर; कोणत्या शहरांत किती रुपयांची दरवाढ? जाणून घ्या
- Amit Shah : तरुणांनी खेड्याकडं जावं, अर्थव्यवस्थेत ग्रामविकासाचं योगदान मिळवल्याशिवाय भारत स्वयंपूर्ण होणार नाही : अमित शाह