Loksabha Elections 2024 : किसमें कितना है दम... INDIA मध्ये 26 तर NDA मध्ये 38 पक्ष... कोण ठरणार 'किंगमेकर'?
INDIA vs NDA : दिल्लीत NDA ची तर बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांची नुकतीच बैठक पार पडली आहे. एनडीए आणि विरोधी पक्ष यापैकी कुणाची ताकद जास्त आहे, हे समीकरण जाणून घ्या.
BJP vs Opposition : देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections 2024) जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील 'एनडीए' (NDA) चा मुकाबला करण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' (INDA) नावाने महाआघाडी स्थापन केली आहे. विरोधकांनी महाआघाडीला 'इंडिया' (INDIA) असं नाव ठेवलं आहे. महायुती 'इंडिया' (INDIA) मध्ये 26 पक्ष आहेत आणि एनडीए (NDA) मध्ये 38 पक्ष आहेत. सत्ता कोणाकडे आहे आणि खरा किंगमेकर कोण होणार हे समीकरण जाणून घ्या.
2014 मध्यो 'मोदी लाट'
2014 च्या निवडणुकीत मतदार राजाने काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतलं आणि देशात मोदी लाट आली. सलग दोन टर्म देशात पंतप्रधान मोदींचीच जादू कायम राहिली. ज्यामुळे विरोधकांना मात्र घाम फुटला. महाराष्ट्राबाबात बोलायचं झालं तर, गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फुटले आणि भाजपच्या साथीने सत्तेत आले. याचीच भीती आता इतर विरोधी पक्षांनाही वाटू लागलीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून विरोधकांची एकजूटी पहायला मिळतं आहे. एनडीए विरोधात विरोधकांची एकमूठ झाल्याचं दिसून येतं आहे.
INDIA की एनडीए पैकी नेमकी ताकद कुणाकडे?
देशाच्या राजकारणाशी संबंधित दोन मोठ्या बैठका मंगळवारी पार पडल्या. 26 विरोधी पक्षांची बेंगळुरूमध्ये एक बैठक झाली. तर दुसरी एनडीएची 38 पक्षांची बैठक दिल्लीत पार पडली. 'इंडिया' (INDIA) आणि एनडीए (NDA) पैकी नेमकी ताकद कुणाकडे?
बेंगळुरू येथे झालेल्या 26 विरोधी पक्षांच्या बैठकीत महायुतीला 'इंडिया' (INDIA) नाव देण्यात आलं आहे. INDIA चा अर्थ 'भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी' (Indian National Developmental Inclusive Alliance) आहे. दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची बैठकही दिल्लीत मंगळवारी पार पडली. या बैठकीत 38 पक्ष सामील झाले होते.
कोणता पक्ष कुणासोबत?
विरोधकांच्या बैठकीत 26 पक्ष सहभागी झाल्याचं सांगण्यात येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 23 जून रोजी पाटणा येथे झालेल्या बैठकीत 15 पक्ष सहभागी झाले होते. हे सर्व 15 पक्ष यावेळीही उपस्थित होते.
काँग्रेस, TMC, आम आदमी पार्टी, CPI, CPI-M, RJD, JMM, NCP, शिवसेना (उद्धव ठाकरे), समाजवादी पार्टी आणि JDU व्यतिरिक्त DMK, KDMK, VCK, RSP, CPI-ML, फॉरवर्ड ब्लॉक, IUML, केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस (मणी), अपना दल (कामेरवाडी) आणि मनिथनेय मक्कल काची (एमएमके).
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएत सामील होणे हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यासोबतच, काही नवीन पक्ष एनडीएमध्ये सामील झाले आहेत. चिराग पासवान सोमवारीच एनडीएमध्ये सामील झाले आहेत. ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) देखील एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत.
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एनडीएच्या बैठकीत 38 पक्षांची उपस्थिती असल्याचा दावा केला आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे गटाची शिवसेना, उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक जनता दल आणि पवन कल्याण यांची जनसेनाही या बैठकीला हजर होती आहे.
कोण-कोणासोबत? : पक्षांची यादी
INDIA मध्ये सामील विरोधी पक्षांची यादी :
काँग्रेस, डीएमके, टीएमसी, जेडीयू, शिवसेना (यूबीटी), एनसीपी (शरद पवार), सीपीआयएम, समाजवादी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, सीपीआय, आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस (एम), आरजेडी , नॅशनल कॉन्फरन्स, PDP, CPI (ML), RLD, मानवतावादी पीपल्स पार्टी (MMK-Manithaneya Makkal Kachi), MDMK, VCK, RSP, केरळ काँग्रेस, KMDK, अपना दल (कमेरावादी) आणि AIFB.
एनडीएमध्ये सामील पक्षांची यादी :
भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), जन सूरज पार्टी (महाराष्ट्र) आणि प्रहार जनशक्ती पार्टी (महाराष्ट्र), राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष (पारस), लोक जनशक्ती पक्ष (रामविलास पासवान), अपना दल (सोनेलाल), एआयएडीएमके, एनपीपी, एनडीपीपी, एसकेएम, आयएमकेएमके, एजेएसयू, MNF, NPF, RPI, JJP, IPFT (त्रिपुरा), BPP, PMK, MGP, AGP, निषाद पार्टी, UPPL, AIRNC, TMC (तमिळ मनिला काँग्रेस), शिरोमणी अकाली दल युनायटेड, जनसेना, HAM , RLSP, Subhaspa, BDJS (केरळ), केरळ काँग्रेस (थॉमस), गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट, जनतापथ्य राष्ट्रीय सभा, UDP, HSDP.
कुणाकडे-किती ताकद?
विरोधकांची इंडिया आणि एनडीएपैकी खरी ताकद एनडीएकडे असल्याचं चित्र आहे. ताकदीच्या बाबतीत एनडीएकडे झुकतं माप आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे लोकसभेत 350 हून अधिक खासदार आहेत. तर, विरोधकांच्या बैठकीत सहभागी झालेल्या सर्व पक्षांचे जेमतेम 150 खासदार आहेत.
दरम्यान, आकडेवारीनुसार विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या 50 टक्क्यांहून अधिक पक्षांचा लोकसभेत एकही खासदार नसल्याची माहिती आहे. तर एनडीएच्या बैठकीत सहभागी झालेल्या 65 टक्के पक्षांना लोकसभेत एकही जागा नाही.