(Source: Poll of Polls)
डिजिटल इंडियाचे आणखी एक पाऊल पडते पुढे; AI आधारित 'Bhashini' प्लॅटफाॅर्मची पीएम मोदींची घोषणा
AI वर आधारित भाषिणी टूल हे भाषांमधील अडथळा दूर करण्याचे काम करणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी जी 20 डिजिटल इकोनॉमी मंत्र्याच्या बैठकीला संबोधित करताना AI आधारित ‘Bhashini’ प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. भाषिणी हे AI वर आधारित भारताने विकसित केलेले अनुवाद करणारे प्लॅटफॉर्म आहे. सध्या जगभरामध्ये AI चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे येथे अनेक जाती धर्मांच लोक खूप आनंदात एकोप्याने राहतात. तसेच येथे अनेक भाषा बोलल्या जातात. मराठी, हिंदी, पंजाबी, नेपाळी, तेलगू, बंगाली यासारख्या अनेक भाषा बोलल्या जातात. AI वर आधारित भाषिणी टूल हे भाषांमधील अडथळा दूर करण्याचे काम करणार आहे. भाषिणीचे मुख्य उद्दिष्ट हे विविध भारतीय भाषांमधील अडथळे दूर करण्याचे आहे.
डिजिटल पेमेंटमध्ये भारत आघाडीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे यात डिजिटल अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. डिजिटल पेमेंट करण्यात भारत सर्वात आघाडीवर आहे. देशातील सर्व सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्त्याच्या खात्यावर जमा होतो, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होते. तसेच यामुळे 33 बिलियनहून अधिक पैशांची बचत झाली आहे.
JAM ट्रिनिटीचा अनेकांना फायदा
VIDEO | "We are building 'Bhashini', an AI powered language translation platform. It will support digital inclusion in all the diverse languages of India," says PM Modi in his virtual address at G20 Digital Economy Ministers' meeting in Bengaluru.
— Press Trust of India (@PTI_News) August 19, 2023
(Source: Third Party) pic.twitter.com/cQqHBxDkQj
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, UIDAI ने विकसित केलेले आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांची संख्या सतत वाढत आहे. लाभार्थी ओळखण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर केला जात आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत सरकारने सुरू केलेली जनधन, आधार आणि मोबाइल (जाम ट्रिनिटी) या संकल्पना देखील अधिक फायदेशीर ठरत आहे. गेल्या नऊ वर्षात भारतात डिजीटल क्रांती झाली आहे. यूपीआयद्वारे 10 अब्ज रुपयांची देवाणघेवाण महिन्याला होते. 2015 साली आम्ही डिजिटल इंडियाची सुरुवात केली आहे.
हे ही वाचा :
PM Modi BRICS Summit 2023 : पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; ब्रिक्स परिषदेत होणार सहभागी