Coronavirus Today : गेल्या 24 तासात देशात 41,649 रुग्णांची भर, 593 जणांचा मृत्यू
Coronavirus Today : देशात काल 37 हजार 291 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तीन कोटी सात लाख 81 हजार 263 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट कायम असल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 41 हजार 649 नव्या रुग्णांची भर पडली असून 593 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या आता चार लाख 23 हजार 810 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 37 हजार 291 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.
India reports 41,649 new #COVID19 cases, 37,291 recoveries, and 593 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
— ANI (@ANI) July 31, 2021
Total cases: 3,16,13,993
Active cases: 4,08,920
Total recoveries: 3,07,81,263
Death toll: 4,23,810
Total vaccination: 46,15,18,479 pic.twitter.com/ZwC3fUVTu4
आतापर्यंत देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या तीन कोटी सात लाख 81 हजार 263 इतकी झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही आता चार लाख आठ हजार 920 इतकी झाली आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 46 कोटी 15 लाख 18 हजार 479 डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये 2.27 लाख गर्भवती महिलांना कोरोनाच्या लसीचा डोस देण्यात आला आहे.
राज्याची स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 6,600 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 431 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 83 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61 टक्के आहे.
राज्यात काल 231 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 30 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 77 हजार 494 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), जालना (92), हिंगोली (70), वाशिम (84), गडचिरोली (54)या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 001 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भिवंडी निजामपूर महानगपालिका, जळगाव महानगरपालिका, नंदूरबार, अकोला, भंडारा आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 830 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 77,60, 862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,96, 756 (13.18 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,79,553 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,289 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 323 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 323 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 366 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,11,073 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,082 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1434 दिवसांवर गेला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Women's Hockey, India Win : भारतीय महिला हॉकी संघाचा शानदार विजय, दक्षिण आफ्रिकेला 4-3 नं नमवलं, वंदना ठरली हिरो
- India-China Standoff : भारत-चीन दरम्यान आज लष्करी बैठक; चीन सैन्य माघार घेणार का याची उत्सुकता
- Coronavirus : लसीकरणाची गती वाढवली नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरणार; WHO चा इशारा