(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus : लसीकरणाची गती वाढवली नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरणार; WHO चा इशारा
Delta Variant : जगभरातील कोरोनाची परिस्थिती अधिक वाईट होण्याआधीच डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण आणलं पाहिजे असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली : जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवं अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे असंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
या वर्षाच्या सप्टेंबर अखेर सर्वच देशांनी आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. येत्या 2022 सालापर्यंत जगभरातील 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण व्हावे अशी अपेक्षाही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
Almost 4 million #COVID19 cases were reported to @WHO last week - many of these were driven by the highly-transmissible Delta variant. We have the tools to stop this virus, but on current trends, we expect the total number of cases to pass 200 million within the next two weeks. pic.twitter.com/pbisUCIg3B
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) July 30, 2021
डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार 132 देशांमध्ये
डेल्टा व्हेरिएंट या जीवघेण्या कोरोनाच्या प्रकाराचा जगभरातील 132 देशांत प्रसार झाला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याचा अधिक प्रसार होण्या आधीच सर्वांनी काळजी घेऊन यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला हवं असं आवाहन करण्यात आलं आहे.
डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणासोबतच सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्यामध्ये फेस मास्क, सोशल डिस्टन्सिंग, योग्य आहार, स्वच्छता आणि गर्दीचे ठिकाण टाळणे या गोष्टींचे पालन करण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- India Enters Finals: डिस्कस थ्रोमध्ये कमलप्रीत कौरनं रचला इतिहास, फायनलमध्ये एन्ट्री, पदकाची प्रबळ दावेदार
- Ganpatrao Deshmukh : ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- बॉक्स ऑफिसवर प्रभास, महेश बाबू आणि पवन कल्याण एकमेकांना भिडणार, एकाच दिवशी होणार तीन चित्रपट प्रदर्शित