Trump Tariff : झुकेगा नहीं साला! ट्रम्प यांच्या 25 टक्के टॅरिफवर भारताची पहिली खणखणीत प्रतिक्रिया
Donald Trump Tariff On India : रशियासोबत असलेल्या लष्करी व्यापाराचा संदर्भ देऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयात शुल्क (Tariff) लावण्याची एकतर्फी घोषणा केल्यानंतर भारत सरकारने यावर आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांच्या घोषणेचा गांभीर्याने अभ्यास केला जात असून, राष्ट्रीय हितांची रक्षा करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. यासंदर्भात कुणाच्या दबावासमोर झुकणार नाही असंही भारताने स्पष्ट केलं आहे.
कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही
परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, भारत कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही आणि देशाच्या सार्वभौम हितांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) यांच्या हितांचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असेल अशी ग्वाही सरकारने दिली आहे.
व्यापार चर्चेला भारताचे पूर्ण समर्थन
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि भारत यांच्यात एक निष्पक्ष, संतुलित आणि परस्पर लाभदायक द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे. भारत यामध्ये पूर्णपणे सकारात्मक असून, रचनात्मक संवादाच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Donald Trump Tariff On India : ट्रम्प यांची एकतर्फी घोषणा आणि टीका
बुधवारी, 30 जुलै रोजी Truth Social या सोशल मीडियावर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की भारताला 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड भरावा लागेल. त्यांनी भारताकडून अमेरिकेच्या वस्तूंवर लावण्यात येणाऱ्या मोठ्या करावर टीका केली. ज्यावेळी रशिया युक्रेनमध्ये हत्याकांड करत आहे आणि जग त्याच्यावर हे युद्ध थांबवण्यासाठी दबाव टाकत आहे अशा वेळी भारत रशियाकडून लष्करी साहित्य खरेदी करत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. त्याचमुळे भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड लावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
भारताची भूमिका आणि पुढील पावले
भारताने याआधीही स्पष्ट केले आहे की, लष्करी सौदे आणि व्यापार निर्णय हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ते कोणत्याही तिसऱ्या देशाच्या दबावाने ठरवले जात नाहीत. सध्या भारत ब्रिटनसोबत व्यापक आर्थिक करारात यशस्वी ठरला आहे आणि तशीच भूमिका अमेरिकेबाबतही घेतली जाईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ घोषणा केल्यानंतर भारत त्याला कसा प्रतिसाद देतो हे पाहावं लागेल. अमेरिकेतील पुढील राजकीय घडामोडी आणि भारत-अमेरिका व्यापार चर्चांचा प्रभाव हे या निर्णयाच्या अंमलबजावणीवर परिणाम करतील.
ही बातमी वाचा :























