Salary Hike | खुशखबर! यावर्षी तुमचा पगार वाढणार
गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेकांना पगार कपातीला सामोरं जावं लागलं होतं. आता या वर्षी भारतीय कंपन्या (India Inc) आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढ (Salary Hike) करण्यास अनुकुल आहेत असा एऑनचा अहवाल सांगतोय.
नवी दिल्ली: भारतातील खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. जवळपास 88 टक्के भारतीय कंपन्या या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढ करण्यास अनुकुल आहेत. एऑन या व्यावसायिक सर्व्हे करणाऱ्या कंपनीच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा फटका बहुतांश सर्व उद्योगांना बसला होता. त्यामुळे आर्थिक मंदी सदृष्य परिस्थिती तयार झाल्याने अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. देशातील सर्वच खासगी उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 40 टक्क्यांपासून ते 60 टक्क्यांपर्यंत कपात केली होती.
सध्या उद्योग क्षेत्र कोरोनाच्या मंदीतून बाहेर येताना दिसतंय. त्यामुळे या वर्षी देशातील 88 टक्के खासगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी सकारात्मक आहेत. एऑनच्या अहवालानुसार सरासरी 7.7 टक्के इतकी पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई एपीएमसीमध्ये भाजीपाल्याचे दर 30-40 टक्क्यांनी उतरले!
भारतात 2021 पासून खाजगी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याचा आलेख सातत्याने खाली येताना दिसतोय. कोरोनाचा फटका बसल्याने 2020 साली खासगी कंपन्यांची पगारवाढ केवळ 6.1 टक्का इतकी झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय.
ई-कॉमर्स आणि व्हेन्चर कॅपिटल क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक म्हणजे 10 टक्के पगारवाढ देतील तर हॉटेल क्षेत्रातील कंपन्या या केवळ 5.5 टक्के पगारवाढ देतील असं एऑनच्या या अहवालात सांगण्यात आलंय. हा अहवाल तयार करण्यासाठी जवळपास 20 उद्योगातील 1200 कंपन्याचा अभ्यास करण्यात आला आहे.
कोरोना काळात जरी आर्थिक मंदी आली असली तरीही BRIC देशांमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यामध्ये भारताचा सर्वात वरचा क्रमांक लागतोय.
मला माफ करा, पण मी वाईट माणूस नाही! मंदार देवस्थळी यांनी मांडली आपली स्थिती