Covid Guidelines : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तयारी, चीन-जपानसह या 6 देशांतील प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी
Covid Guidelines : भारत सरकारने चीन-जपान आणि कोरियासह 6 देशांमध्ये हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुधारित कोविड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Covid guidelines for International Arrivals : जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. याच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन भारत सरकारने (Indian Government) या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी सुधारित कोविड मार्गदर्शक तत्त्वे (covid-19 Guidlines) जारी केली आहेत. तर आता चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जपान अशा 6 देशांतून येणाऱ्या लोकांसाठी RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. सुधारित कोविड गाइडलाइनमध्ये इतरही अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
कोविड गाइडलाइन्समध्ये इतर अनेक गोष्टींचा उल्लेख
भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने असे म्हटले आहे की, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे 1 जानेवारी 2023 पासून, चीन, सिंगापूर येथून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR नकारात्मक चाचणी अहवाल (RT) आवश्यक असेल. हाँगकाँग, कोरिया रिपब्लिक, थायलंड आणि जपान या देशांतून येणाऱ्या लोकांसाठी RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल अनिवार्य असेल, जो त्यांना विमानतळावर दाखवावा लागेल. मंत्रालयाने सांगितले की, एअरलाइन्सना त्यांच्या चेक-इन वर्किंग कपॅसिटीत काही बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांनी एअर सुविधा पोर्टलद्वारे नोंदणी केली आहे. तसेच ज्यांनी सेल्फ-डिक्लियरेशन फॉर्म म्हणजेच स्व-घोषणापत्र सादर केले आहे. अशा चीनसह सहा देशांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच बोर्डिंग पास जारी करण्याचे निर्देश आहेत.
प्रवाशांना दाखवावा लागणार 'सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म'
मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, "चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जपान येथून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हवाई सुविधा पोर्टल 'सेल्फ डिक्लेरेशन' ची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे." ज्यामध्ये परदेशातून भारतात येणाऱ्या या प्रवाशांसाठी RT-PCR नकारात्मक चाचणी अहवाल तसेच 'सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म' अपलोड करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
प्रवाशांचा RT-PCR चाचणी अहवालही आवश्यक
सुधारित कोविड मार्गदर्शक तत्त्वानुसार, लोकांनी विमान प्रवास सुरू करण्यापूर्वी 72 तास आधी RT-PCR चाचणी करणे आवश्यक आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये येणार्या प्रवाशांपैकी 2% प्रवाशांच्या रैंडम टेस्टिंगची प्रणाली देखील सुरू राहील.
SARS-CoV-2 प्रकार 6 देशांमध्ये आढळले
अधिकार्यांनी सांगितले की, जगाच्या विविध भागांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढती रुग्णसंख्या तसेच 6 देशांमध्ये SARS-CoV-2 प्रकार आढळून आल्याच्या अहवालात हे निर्णय घेण्यात आले आहेत. काल, भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुधारित कोविड मार्गदर्शक तत्त्वांची माहिती सर्व व्यावसायिक विमान कंपन्या, विमानतळ ऑपरेटर आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव/प्रशासक यांना पाठवली. अधिकृत आकडेवारीनुसार 29 डिसेंबर रोजी एकूण 83,003 परदेशी प्रवासी देशात आले.
इतर बातम्या
Coronavirus Today India : कोरोनाचा धोक्यावर खबरदारीचा उपाय, महाराष्ट्रात कोविड लसीकरणात तीन पटीने वाढ; देशात 226 रुग्ण पॉझिटिव्ह
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )