Golden Pearl Tea : आसामच्या चहाला लाखमोलाचा भाव, 'गोल्डन पर्ल टी'ला 99 हजार 999 रुपये दर
Golden Pearl Tea: गोल्डन पर्ल टी हा आसामच्या दिब्रुगढमधील स्पेशल चहा आहे. चहाच्या मळ्यामधून आलेल्या पानांवर प्रक्रिया करून हा स्पेशल चहा तयार केला जातो.
नवी दिल्ली : सकाळी उठून चहाची तलफ बहुतेकांना येते अशाच चहा प्रेमींसाठी एक लाख मोलाची बातमी आली आहे. आसामच्या दिब्रुगढमध्ये तयार झालेल्या एका चहाला चक्क लाखमोलाचा दर मिळालाय. दिब्रुगढच्या नाहोरचुकबारी कारखान्यात तयार झालेल्या गोल्डन पर्ल टीला (Golden Pearl tea) चहाच्या लिलावात चक्क 99 हजार 999 रुपये प्रतिकिलो एवढा दर मिळाला आहे. आसाम टी ट्रेडर्सनं या खास चहासाठी ही बोली लावली.
गोल्डन पर्ल टी हा आसामच्या दिब्रुगढमधील स्पेशल चहा आहे. चहाच्या मळ्यामधून आलेल्या पानांवर प्रक्रिया करून हा स्पेशल चहा तयार केला जातो. गोल्डन पर्ल टी शिवाय अरुणाचल प्रदेशातील गोल्डन नीडल आणि आसामच्या गोल्डन बटरफ्लाय या चहांना प्रतिकिलो 75 हजारांचा दर मिळाला आहे. दोन महिन्यांपूर्वी 14 डिसेंबर 2021 ला गुवाहटीच्या चहा ऑक्शन सेंटरमध्ये मनोहारी टी एस्टेटमधील मनोहारी गोल्ड (Manohari Gold) चहासाठी 99,999 रुपयांची बोली लागली होती.
गोल्डन पर्ल टीचे पेटेंन्ट एएफटी टेक्नो ट्रेड (AFT Techno Trade) जवळ आहे. GTAC चे सेक्रेटरी प्रियानुज दत्ता यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार गोल्डन पर्ल टी आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्यातील नाहोरचुकबारी कारखान्यात तयार झाली आहे. गोल्डन पर्ल टीला लीलावात सेल नंबर-7 आणि लॉट नंबर- 5001 मध्ये ठेवली होती.
याअगोदर ऑगस्ट 2021 मध्ये अरूणाचल प्रदेशच्या Donyi Polo Tea Estate च्या गोल्डन नीडल 'Golden Needle' आणि Dikom Tea garden of Assam च्या गोल्डन बटरफ्लाई 'Golden Butterfly'वर झालेल्या लिलावात 75,000 रुपये प्रति किलोची बोली लागली होती. तर 2019 मध्ये गुवाहटीच्या ती ऑक्शन सेंटरमध्ये मनोहारी गोल्ड टी (Manohari Gold Tea) 50,000 रुपयांची बोली लागली होती. ही त्यावेळची सर्वात मोठी बोली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Omicron variant : त्वचेच्या 'या' प्रकारच्या समस्यांना थंडीचे दुष्परिणाम समजू नका, होऊ शकतो गंभीर परिणाम
- Sapota For Health : चिकू खाल्ल्याने मिळते झटपट एनर्जी, अशक्तपणा दूर होण्याबरोबरच शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
- Omicron Variant : तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात 'हे' सुपरफूड, जाणून घ्या याचे फायदे