Indian Economy : मागच्या वर्षीच्या तुलनेनं भारताचा विकास दर सुसाट , सलग दुसऱ्या तिमाहीत विकास दर 7.6 टक्क्यांवर
Indian Economy : जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीच्या कालावधीत आर्थिक विकास दर 7.6 टक्के असल्याची माहिती केंद्राच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून देण्यात आलीये.
![Indian Economy : मागच्या वर्षीच्या तुलनेनं भारताचा विकास दर सुसाट , सलग दुसऱ्या तिमाहीत विकास दर 7.6 टक्क्यांवर India GDP grows 7.6 percent in quarter 2 for year 2024 compared to quarter one for year 2024 detail marathi news Indian Economy : मागच्या वर्षीच्या तुलनेनं भारताचा विकास दर सुसाट , सलग दुसऱ्या तिमाहीत विकास दर 7.6 टक्क्यांवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/30/860c335ba285f5638ab4470cfe2ac00b1701339321771800_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) एक चांगली बातमी समोर आली आहे. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर (Growth Rate) हा 7.6 टक्के इतका राहिला आहे. केंद्राच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आलीये. दरम्यान एप्रिल ते ऑक्टोबरच्या दरम्यान वित्तीय तुटीचा आकडा हा 8.04 लाख कोटींवर पोहचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank Of India) दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर हा 6.5 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर हा 7.8 टक्के इतका होता.
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दर 7.8 टक्के होता. दुसऱ्या तिमाहीतही अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ झाली आहे. आर्थिक व्यवहार सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या तिमाहीत विकास दराचे आकडे हे चांगले असणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. अन्न अनुदानावरील खर्चात वाढ झाली असली तरी वित्तीय तूट 5.9 टक्के राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
या क्षेत्रात झाली वाढ
यंदाच्या तिमहीत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिचा आर्थिक विकास दर हा 13.9 टक्क्यांवर पोहचला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. याच कालावधीमध्ये मागील वर्षी हा दर 3.8 टक्के होता. तर पहिल्या तिमाहीत हा आकडा 4.7 टक्क्यांवर होता. दरम्यान गुरुवारी सरकारी आकडेवारीवरून असे दिसून आले की आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांचे उत्पादन ऑक्टोबर 2023 मध्ये 12.1% वाढले होते. दरम्यान यंदाच्या तिमाहीमध्ये अनेक क्षेत्रांनी चांगली वाढ नोंदवली असल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान, 6 ऑक्टोबर 2023 रोजी चलनविषयक धोरण जाहीर करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, शहरी भागात मागणी वाढल्यानं वापर वाढला आहे. तर ग्रामीण भागातही मागणीत सुधारणा दिसून येत आहे. सेवा, ग्राहकमध्ये वाढ चांगली असून सरकारच्या भांडवली खर्चात वाढ झाल्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होत आहे. बँका आणि कॉर्पोरेट्सच्या ताळेबंदात सुधारणा झाली आहे, पुरवठा साखळी सुधारली आहे. पण आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, जागतिक तणाव आणि आर्थिक आव्हाने सर्वात मोठा धोका अर्थव्यवस्थेसाठी अनेक अडचणी निर्माण करत आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)