एक्स्प्लोर

एकाच टेस्टिंग किटद्वारे तब्बल तीन आजारांची चाचणी शक्य; पहिलं स्वदेशी टेस्टिंग किट लॉन्च

India Get New Covid Kit: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीनं अशी एक किट विकसित केली आहे. ज्यामुळे तुम्हाला एकाच किटद्वारे तीन फ्लू करता येतील, यासाठी तुम्हाला वेगळं किट खरेदी करावं लागणार नाही.

India Get New Covid Kit: पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (National Institute of Virology) नं देशातील नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. एनआयव्हीनं (NIV) एक थ्री इन वन टेस्टिंग किट शोधून काढलं आहे. या एकाच किटद्वारे एन्फ्लुएंझा ए, बी आणि SARS-CoV-2 अशा तीन संसर्गजन्य आजारांचा शोध घेणं शक्य होणार आहे. हे पहिलं स्वदेशी टेस्टिंग किट आहे, जे एकच किट तीन आजारांची चाचणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. 

एनआयव्ही पुणेच्या इन्फ्लुएंझा विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा पोतदार यांनी सांगितलं की, इन्फ्लूएंझा ए, बी आणि कोविड-19 शोधण्यासाठी किट मल्टीप्लेक्स सिंगल ट्यूब रिअलटाईम आरटी-पीसीआर चाचणी  (Multiplex Single Tube Realtime RT-PCR Test) म्हणून ओळखलं जाईल. एका चाचणीद्वारे तीन संसर्गजन्य आजारांचा शोध घेणं शक्य होणार आहे. हे टेस्टिंग किट अत्यंत सोपा, वेळ वाचवणारा आणि कार्यक्षम मार्ग आहे, असं त्या म्हणाल्या. सिंगल ट्यूबचा मूलत: अर्थ असा आहे की, एखाद्या व्यक्तीकडून एकच नमुना वापरून, आम्ही अनेक संक्रमणांचं निदान करणं शक्य आहे. 

"एकाच टेस्टिंग किटद्वारे तीन संसर्गजन्य आजार शोधण्याचा हा एक सोपा आणि वेळ वाचवणारा, कार्यक्षम मार्ग असेल. सिंगल ट्यूबचा अर्थ असा आहे की, मानवाकडून एकच नमुना वापरून आम्ही अनेक संसर्गजन्य आजारांचा शोध घेण्यात सक्षम असू शकतो. या टेस्टिंग किटमध्ये नमुन्याची स्वतंत्रपणे चाचणी करावी लागणार नाही. या तिन्ही संसर्गाची लक्षणं ओव्हरलॅप होतात, ज्यामुळे या प्रकारचा किट विशेषत: आजारांची साथ येते तेव्हा उपयुक्त ठरतो.

डॉ पोतदार यांनी असंही सांगितलं की, 15 मे रोजी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (Indian Council of Medical Research-ICMR) ) या सहयोगी संस्थेनं हे टेस्टिंग किट मोठ्या प्रमाणात बनवण्यासाठी कंपन्यांकडून एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) देखील मागितलं होतं. या टेस्टिंग किटमध्ये, कोविड-19 टेस्टिंग किटप्रमाणेच रुग्णाच्या नाक आणि घशाची लाळ वापरली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, हे टेस्टिंग किट एकाच नमुन्याचा वापर करून अनेक आजारांचं निदान करण्यासाठी सक्षम असेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आता 'सामाजिक फायद्यासाठी तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण करण्यास सक्षम' करण्यासाठी परवानाधारक कंपन्यांना तंत्रज्ञान सोपवू इच्छित आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आजपासून 'नोटबदली' सुरू... जाणून घ्या दोन हजारांची नोटांसंदर्भातील तुम्हाला पडलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget