India Covid-19 Cases : गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 2124 नवीन रूग्णांची नोंद, तर 17 जणांचा मृत्यू
India Covid-19 Cases : गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 2124 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, या आजारातून बरे झाल्यानंतर 1977 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहेत.
India Covid-19 Cases : भारतातील कोरोना व्हायरसची स्थिती सध्या स्थिर असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज सुमारे दोन हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 2124 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, कोरोना संसर्गामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या काय आहे कोरोनाची ताजी परिस्थिती.
सक्रिय संख्या 4,31,42,192 वर पोहोचली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 2,124 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, संसर्गाच्या रुग्णांची संख्या 4,31,42,192 झाली आहे, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 14,971 झाली आहे. वर गेला आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे आणखी 17 रुग्ण दगावल्यामुळे देशातील मृतांची संख्या 5,24,507 झाली आहे. त्याच वेळी, उपचाराधीन रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.03 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.75 टक्के आहे.
राज्यात मंगळवारी सक्रिय रुग्ण दोन हजारापार
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. काल (मंगळवारी) राज्यामध्ये 338 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 276 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात काल एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,33, 452 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.
मंगळवारी मुंबईत 218 नव्या रुग्णांची भर
मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 218 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी 17 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मंगळवारी 158 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महत्वाच्या बातम्या :