एक्स्प्लोर

Nashik Aviation Wing : नाशिकच्या 'कॅट्स'चा दीक्षांत सोहळा दिमाखात, 37 वैमानिकांची 'हॅप्पी लँडिंग' 

Nashik Aviation Wing : भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची 37 वी तुकडीचा दीक्षांत सोहळा गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये दिमाखात पार पडला.

Nashik Aviation Wing : शिस्तबद्ध पडणारी पाऊल, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण…अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये 37 व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने डोळ्यांची पारणे फेडणारा ठरला.

नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. निमित्त होतं, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या दीक्षांत सोहळ्याचे. कॅट्सच्या हवाई तळावर लष्करी थाटात दीक्षांत संचलनाला सुरुवात झाली. 37 जणांच्या वैमानिकाच्या या तुकडीचे मुख्य आकर्षण होत्या कॅप्टन अभिलाषा बराक. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशनच्या दीक्षांत सोहळ्यास आज त्यांची विशेष उपस्थिती होती.  

दरम्यान युद्धाच्या वेळी महत्वाची साथ देणार्‍या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये 37 व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी  एव्हिएशन स्कूलमध्ये हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधित त्यांच्याकडून संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. यामध्ये शत्रुंवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमीना सुरक्षित ठिकाणी उपचार्थ हलविणे आदीसह विविध बाबींचे सखोल ज्ञान दिले जाते. 

मनाचा ठाव घेणाऱ्या कसरती 
दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूने चित्तथरारक कसरती सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले. हवेत करण्यात आलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलातील चमूने उपस्थितांची मने जिंकली. हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर दाखल होत शत्रूच्या छावण्यांवर हल्ला चढविणे, जखमी सैनिकांना एअर लिफ्ट करणे, एकाचवेळी चार चार हेलिकॉप्टरवर हल्ला करून जाणे, अशी हृदयाचा ठोका चुकविणारी प्रात्यक्षिके सादर झाली. यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते 37 वैमानिकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

कॅप्टन अभिलाषा बराक यांच्याविषयी....
मूळच्या हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्याच्या रहिवासी कॅप्टन अभिलाषा बराक या 2018 मध्ये सैन्य दलात भरती झाल्या. त्यांचे वडील आणि भाऊ यांनी देखील सैन्यदलात सेवा बजावली आहे. यावेळी त्या सोहळ्याच्या प्रमुख म्हणून उपस्थित होत्या. कॅप्टन अभिलाषा बराक यांची राष्ट्पती समोर होणाऱ्या हवाई दलाच्या प्रत्यक्षिकासाठी कमांडर म्हणून निवड झाली होती. या बहुमानानंतर त्यांनी कॅट्स मध्ये लढाई हेलिकॉप्टर उड्डाणचे खडतर प्रशिक्षण घेतले. आजच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांना वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून एव्हीएशन विंग प्रदान करण्यात आली. अभिलाषा बराक या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट असल्याने फ्लेजलींग ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवलेJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 18 April 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
Embed widget