एक्स्प्लोर

India Corona Updates : कोरोनाचं संकट अधिक गडद; काल एकाच दिवसात रुग्णसंख्येत 12 टक्क्यांनी वाढ

India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर 47,092 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

India Coronavirus Updates : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 47,092 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. एका दिवसाआधी देशात 41,965 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत 509 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 35,181 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद केरळ राज्यात करण्यात येत आहे. केरळात कोरोना संसर्गामुळं बुधवारी 32,803 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केरळात एकूण 40 लाख 90 हजार 36 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 20,961 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

भारतातील एकूण परिस्थिती 

भारतात कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 28 लाख 57 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 39 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 28 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 89 हजार रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत. 

देशातील कोरोनाची सद्यस्थिती :

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 28 लाख 57 हजार 937
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 20 लाख 28 हजार 825
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 89 हजार 583
एकूण मृत्यू : चार लाख 39 हजार 529
एकूण लसीकरण : 66 कोटी 30 लाख 37 हजार लसीचे डोस

राज्यात काल (बुधवारी) 4, 456 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 183 रुग्णांचा मृत्यू

राज्यात काल (बुधवारी)  4, 456 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 430  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 77 हजार 230 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 03 टक्के आहे. 

राज्यात काल (बुधवारी) 183 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 40 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 078 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 091 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (51), नंदूरबार (2),  धुळे (23), जालना (17), परभणी (44), हिंगोली (59),  नांदेड (26),  अमरावती (97), अकोला (22), वाशिम (3),  बुलढाणा (48), यवतमाळ (12), नागपूर (76),  वर्धा (6), भंडारा (6), गोंदिया (2),  गडचिरोली (31) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 

मालेगाव, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, वाशिम,  या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 41,54,890 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,69,332 (11.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,901,427 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,071  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 329 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 329 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 416 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,950 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3187 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1479 दिवसांवर गेला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget