(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Coronavirus Cases : जगातील एकूण रुग्णसंख्येपैकी 40 टक्के रुग्ण भारतात, गेल्या 24 तासांत 357,229 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
India Coronavirus Cases : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत असून दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. जगभरातील एकूण दैनंदिन रुग्णसंख्येपैकी केवळ 40 टक्के रुग्णसंख्येची दरदिवशी भारतात नोंद होत आहे.
India Coronavirus Cases : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. अशातच देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. तर अनेकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 357,229 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 3449 रुग्णांचा जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, 3,20,289 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी रविवारी देशात 368,060 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. जगभरातील एकूण दैनंदिन रुग्णसंख्येपैकी केवळ 40 टक्के रुग्णसंख्येची दरदिवशी भारतात नोंद होत आहे.
3 मेपर्यंत देशभरात 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 17 लाख 08 हजार 390 लसीचे डोस देण्यात आले. आतापर्यंत एकूण 29 कोटी 33 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर सोमवारी देशात 16.63 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. ज्यांचा पॉझिटिव्हीटी रेट 19 टक्क्यांहून अधिक आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 2 लाख 82 हजार 833
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 66 लाख 13 हजार 292
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 34 लाख 47 हजार 133
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 22 हजार 408
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 15 कोटी 89 लाख 32 हजार 921 डोस
राज्यात सोमवारी 48,621 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 59, 500 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात सोमवारी कोरोनाबाधित रुग्णसंख्येत काहीशी घट झाली आहे. राज्यात काल 48 हजार 621 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 59, 500 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात 6 लाख 56 हजार 870 रुग्णांना उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 70 हजार 851 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कालपर्यंत एकूण 40,41,158 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 84.7% एवढा झाला आहे. दरम्यान काल 567 कोरोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,78,64,426 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 47,71,022 (17.12 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,08,491 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 28,593 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत काल दिवसभरात 2 हजार 662 रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात मुंबईत 2 हजार 662 रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 5746 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 89 टक्क्यांवर आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी 111 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.
देशात पुन्हा लॉकडाऊन? टास्क फोर्सची केंद्र सरकारला शिफारस, सुत्रांची माहिती
एकीकडे सर्वोच्च न्यायालयानं लॉकडाऊन लावण्याविषयीच्या सूचना केल्या आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या टास्क फोर्सकडून देशात कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानंही केंद्र सरकारला सल्ला दिला होता की, देशात लॉकडाऊन लावण्याच्या शक्यतेवर विचार करावा. अशातच आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनंही कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस केली असल्याची माहिती मिळत आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनं देशात कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. कारण देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. अनेक डॉक्टर्सही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊनची गरज असल्याचंही टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :